टाटा सफारीत सध्या केवळ 2.0 क्रायोटिक इंजिन बसवण्यात येतं. हे इंजिन 168 bhp पॉवर असणारं असतं. हे इंजिन 350 Nm चा टॉर्क तयार करतं. टाटा मोटर्स सफारी गाडीच्या पेट्रोल इंजिनाचंही टेस्टिंग करत असल्याचं दिसून आलं आहे. टेस्टिंगची प्रक्रिया सुरू असताना लाल रंगाची नंबर प्लेट लावलेली कार काहीजणांना दिसली होती. भारतात, कारच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार आणि वापरानुसार त्याला वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट दिल्या जातात.
अधिक वाचा - Hyundai Small Electric Car : ह्युंडाईच्या छोट्या ई-कार लवकर भारतात लॉन्च, कंपनी पाहतेय एकाच गोष्टीची वाट
पांढरी प्लेट आणि काळी अक्षरं यांचा वापर पीव्ही म्हणजेच पर्सनल व्हेईकलसाठी केला जातो. पिवळी प्लेट आणि काळी अक्षरं असतील तर ते सीव्ही म्हणजेच कमर्शिअल व्हेईकल असतं. लाईट कमर्शिअल व्हेईकल आणि हेवी कमर्शिअल व्हेईकल या दोन्हीला एकाच रंगाची नंबर प्लेट अते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट असतात, ज्यात हिरवा रंग कॉमन असतो. जर त्यावरील अक्षरं पांढऱ्या रंगाची असतील, तर ते पर्सनल व्हेईकल असतं आणि जर पिवळ्या रंगाची असतील तर कमर्शिअल व्हेईकल असतं.
अधिक वाचा - Moto G22 specifications leak : Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होणार लॉन्च
टाटा सफारीची जी गाडी जयपूरमध्ये आढळली, त्याची नंबर प्लेट ओरिजिनल असल्याची खात्री करण्यात आली आहे. या गाडीवर हिरवी प्लेट आणि पांढऱ्या रंगाची अक्षरं दिसली होती. त्यावरून ती गाडी इलेक्ट्रिक व्हेईकल असल्याचं सिद्ध झालं. अनेकदा खोट्या नंबर प्लेट लावून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जातो. मात्र हा त्यातला प्रकार नसल्याचं सिद्ध झालं आहे. आरटीओच्या होलोग्रामसह नॉन रिमूव्हेबल बोल्ट त्यात बसवण्यात आले होते. आता प्रत्यक्ष टाटा कंपनीकडून या गाडीची कधी औपचारिक घोषणा होते, त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.