Tata motors launched Tata Tiago NGG XT: टाटा मोटर्सने भारतीय बाजारात Tiago NRG XT व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. या मॉडेलला भारतीय बाजारात एक वर्ष पूर्ण झाल्याने कंपनीने हे मॉडल लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा टियागो NRG XT व्हेरिएंटची एक्सशोरूम किंमत 6.42 लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि कंपनीने तरुणांना डोळ्यासमोर ठेवून ही गाडी तयार केली आहे. (TATA Tiago NRG चं XT launched in india know price features and specifications)
Tiago NRG XT व्हेरिएंट खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. इतक्या कमी किमतीत ही गाडी लॉन्च केल्याने पैसा वसूल असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच या कारमध्ये फीचर्स सुद्धा खूप हायटेक देण्यात आले आहेत.
नवी टाटा टियागो NRG XT मध्ये 114 इंच हायपरस्टाईल व्हील्स, 3.5 इंच इन्फोटेन्मेंट सिस्टम, स्टियरिंग माऊंटेड कंट्रोल्स, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि पुढील भागात फॉग लॅम्प सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : Second hand car खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी
यासोबतच गाडीमध्ये स्टॅंडर्ड मॉडर्नवाला 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे 84 bHp ताकद आणि 113 Nm पीक टॉर्क आहे. कंपनीने या कारमध्ये इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्ससोबत उपलब्ध करुन दिलं आहे.
लॉन्चिंगच्या मुहूर्तावर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हिएकलचे सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर केअर वॉईस प्रेसिडेंट राजन अंबा यानंनी म्हटलं, "सणासुदीचा काळ सुरू होताच आम्ही आपल्या ग्राहकांसाठी टियागो NRG XT लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा आम्हाला खूप आनंद होत आहे. ही गाडी खूपच आकर्षक किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की, XT व्हेरिएंट NRG आणि टियागोच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओची विक्री आणखी मजबूत करेल."