टाटाची Tigor ऑटोमेटिक लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

भ्रूममभ्रूमम
Updated Jun 18, 2019 | 15:51 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Tata Tigor: टाटा कंपनीने आपली एन्ट्री लेवलची सेडान कार टिगॉरचं ऑटोमेटिक व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. जाणून घ्या या टाटा टिगॉर एएमटीची किंमत आणि फिचर्स काय आहेत.

tata tigor automatic variant
टाटाची Tigor ऑटोमेटिक लॉन्च 

नवी दिल्ली: टाटा मोटर्स कंपनीने आपली कॉम्पॅक्ट सेडान कार टिगॉरचं ऑटोमेटिक (एएमटी) व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. या नव्या व्हेरिएंटची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 6.39 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, कंपनीने आपली टिगॉर एएमटी सीरिजमध्ये एक्सएमए (XMA) आणि एक्सझेडए प्लस (XZA+)हे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. या कारची किंमत 6.39 लाख रुपयांपासून 7.24 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह दोन नवे ट्रिम्स लॉन्च केले जाणार आहेत. टाटा मोटर्सचे विक्री, वितरण आणि ग्राहक सहायता विभागाचे उपाध्यक्ष एस. एन. बर्मन यांनी सांगितले की, कंपनीने आपल्या ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवे उत्पादन सादर करण्याच्या प्रयत्नांपैकी एक भाग आहे. 

नव्या कारमध्ये इंटीग्रेटेड एलईडीसह 15 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील आणि ऑटो-फोल्ड ओआरव्हीएम (रिअर व्ह्यू मिरर) देण्यात आले आहेत. दोन्ही व्हेरिएंटमध्ये ड्रायव्हिंग मोड्स सोबत, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसह म्युझिक सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, कप होल्डर्ससह फोल्डेबल रिअर आर्मरेस्ट सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 

टाटा मोटर्सने सांगितले की, नव्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये दोन एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेक, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्यूशन, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेंसर, स्पीड डिपेंडेंट ऑटोमेटिक डोअर लॉकिंग सारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

Tata Tigor AMT

या नव्या कारमध्ये 1.2 लिटरचं तीन सिलिंडरचं रिवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 85 पीएमचा स्पीड आणि 114 Nm टॉर्क जनरेट करतं. याव्यतिरिक्त कारमध्ये 1.05 लिटरचे तीन सिलिंडरचं रिवोट्रॉक डिझेल इंजिनचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे. हे इंजिन 70 पीएस आणि 140 Nm चं टॉर्क जनरेट करतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
टाटाची Tigor ऑटोमेटिक लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स Description: Tata Tigor: टाटा कंपनीने आपली एन्ट्री लेवलची सेडान कार टिगॉरचं ऑटोमेटिक व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. जाणून घ्या या टाटा टिगॉर एएमटीची किंमत आणि फिचर्स काय आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola