Tata Tigor EV: एकदा फुल चार्ज केल्यास चालणार 213 किलोमीटर, पाहा किंमत आणि फिचर्स

Tata Tigor Price: टाटा कंपनीने टिगोर ईव्ही बाजारात लॉन्च केली आहे. ही कार सर्वच खरेदीदारांसाठी उपलब्ध आहे. या कारची खास बाब म्हणजे एकदा चार्ज केल्यास ही कार तब्बल 213 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे.

Tata Tigor Electric Sedan
Tata Tigor Electric Sedan 

थोडं पण कामाचं

  • टाटा कंपनीने टिगोर ईव्ही तीन व्हेरिएंटमध्ये केली लॉन्च
  • एकदा फुल चार्ज केल्यास कार चालणार 213 किलोमीटर
  • कारमध्ये 21.5 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे

नवी दिल्ली: टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक सेडान कार टिगोर ईव्ही लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार वाढलेल्या रेंजसह लॉन्च केली आहे जी पूर्वीपेक्षा अधिकचा पल्ला गाठणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एआरएआय सर्टिफिकेटनुसार ही कार एकदा फुल चार्ज केल्यास 213 किलोमीटर पर्यंत चालणार आहे. नवी टिगोर ईव्ही ही कार तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे ज्यामध्ये एक्स ई प्लस, एक्स एम प्लस आणि एक्स टी प्लस यांचा समावेश आहे.

नवी टिगोर ईव्ही ही कार 30 शहरांत उपलब्ध होणार आहे आणि या कारची सुरुवाती किंमत 9.44 लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे. कारची ही किंमत इलेक्ट्रिक कारवर मिळणारी सरकारी सबसिडी कमी केल्यानंतरची आहे. नव्या व्हेरिएंटच्या या कारमध्ये उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरिअंस, लो कॉस्ट ओनरशिप, कनेक्टिव्हिटी, झिरो इमिशन आणि सेडान कम्फर्ट हे सर्वकाही उपलब्ध होणार आहे.

टाटा टिगोर ईव्हीची किंमत (एक्स शोरूम दिल्ली) 

  1. Tata Tigor XE+ : 13.09 लाख रुपये 
  2. Tata Tigor XM+ : 13.26 लाख रुपये 
  3. Tata Tigor XT+ : 13.41 लाख रुपये 

नव्या व्हेरिएंटच्या लॉन्चिंग दरम्यान टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक व्हिएकल बिझनेस, सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर सर्व्हिस प्रमुख अशेष धार यांनी सांगितले की, 'टिगोर ईव्ही दूरचा प्रवास करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करणार आहे तसेच ही कार कमर्शिअलमध्ये नागरिकांना जास्त उत्पन्न मिळवून देण्यास मदत करणार आहे. या कारचं लॉन्चिंग म्हणजे भारतीय ग्राहकांसाठी आम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आहे.'

नवी टिगोर ईव्ही दोन ड्रायव्हिंग मोड- ड्राइव्ह आणि स्पोर्ट मध्ये उपलब्ध आहे. कारच्या एक्सटीरियरचं बोलायचं झालं तर यामध्ये सिग्नेचर ईव्ही डीकॉल, प्रीमियम फ्रंट ग्रिल, स्टायलिश एलॉय, शार्क फिन अँटिना, एलईडी माउंट स्टॉप लॅम्पचा समावेश आहे. ही कार तीन रंगांत उपलब्ध आहे. इंटेरिअरनुसार, कारमध्ये उंचीनुसार अॅडजस्टेबल सीटची सुविधा देण्यात आली आहे. कारमध्ये 21.5 किलोवॅटची बॅटरी देण्यात आली आहे जी दूरचा प्रवास करण्यास सक्षम आहे. कारमध्ये दोन चार्जिंग पोर्ट (फास्ट चार्जिंग आणि स्लो एसी चार्जिंग पोर्ट) देण्यात आले आहेत. सोबतच कारमध्ये ड्युअल एअरबॅग आणि एबीएस सेफ्टी फिचर्सही देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी