Bitcoin ने खरेदी करु शकाल Tesla कार, जाणून घ्या किती बिटकॉईनमध्ये मिळेल कार

Tesla car buy with Bitcoin: टेस्ला कंपनीने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की त्यांनी 1.5 बिलियन डॉलर्स किमतीचे बिटकॉईन विकत घेतले आहेत आणि लवकरच डिटिजल चलन स्वीकारण्यास सुरुवात करतील.

Tesla car now you can buy with bitcoin said Elon Musk
Bitcoin ने खरेदी करु शकाल Tesla कार 

मुंबई : टेस्ला (Tesla) ची इलेक्ट्रिक कार खरेदी कऱण्यासाठी आता नागरिक क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनचा (Bitcoin) वापर करु शकतात असे टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी जाहीर केले आहे. यानुसार सध्या अमेरिकेतील नागरिक बिटकॉईनच्या सहाय्याने टेस्ला कार खरेदी करु शकतात. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत इतरही देशांत हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक कार निर्माता जगप्रसिद्ध कंपनी टेस्लाने एक महिन्यापूर्वी जाहीर केले होते की, कंपनीचे उत्पादन बिटकॉईनच्या माध्यमातून खरेदी करण्यास लवकरच सुरुवात करण्यात येईल. टेस्लाने यापूर्वीच बिटकॉईनमध्ये 1.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. (Tesla car now you can buy with bitcoin said Elon Musk)

टेस्ला कार खरेदीसाठी किती बिटकॉईन आवश्यक?

सध्या एका बिटकॉईनची किंमत 56000 डॉलरहून अधिक आहे. म्हणजेच ग्राहकांना एन्ट्री लेवल (बेस मॉडल) टेस्ला कार खरेदी करण्यासाठी एका कॉईन पेक्षाही कमी रकमेची आवश्यकता असेल. एन्ट्री लेवल टेस्ला म़ॉडल 3 स्टँडर्स रेंज प्लसची सुरुवाती किंमत 37,990 डॉलर इतकी आहे. तर लॉन्ग रेंजच्या कारची किंमत 46,990 डॉलरपासून सुरू होते. या व्यतिरिक्त टॉप-ऑफ-द-लाइनची किंमत 54,990 डॉलर इतकी आहे.

एलॉन मस्क यांचे ट्विट

टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "तुम्ही आता बिटकॉईनने टेस्ला कार खरेदी करु शकतात." टेस्ला कंपनी पेमेंटसाठी इंटरनल आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा उपयोग करणार आहे.

वर्षा अखेरपर्यंत इतरही देशांत मिळणार सुविधा

टेस्ला कंपनीने सांगितले की, बिटकॉईनच्या माध्यमातून कार खरेदी करण्याची सुविधा सध्या अमेरिकेत उपलब्ध असून वर्ष अखेरपर्यंत इतरही देशांत ही सुविधा उपलब्ध होईल. कंपनीच्या यूएस वेबसाईटवर आता पेमेंटसाठी क्रिप्टोकरन्सीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पेमेंटसाठी ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करण्याचा किंवा बिटकॉईन वॉलेट पत्ता कॉपी-पेस्ट करण्याचा पर्याय असेल. टेस्लाच्या बिटकॉईन पेमेंटच्या अटी आणि शर्तीनुसार त्यांच्या वाहनांची किंमत यूएस डॉलरमध्ये राहील.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी