Car Recall : या मोठ्या कंपनीने ग्राहकांकडून परत मागवल्या लाखो कार...पाहा काय आहे कारण

Tesla Car : इलॉन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला ही कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कारसाठी प्रसिद्ध आहे. टेस्लाने तब्बल 11 लाख कार परत मागवल्या आहेत. कारच्या खिडकी बंद होताना तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होऊ शकतो. बिघाड दूर करण्यासाठी टेस्लाने घेतला निर्णय. टेस्लाने तांत्रिक अपडेट देण्याचे ठरवले.

Tesla car
टेस्ला कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टेस्लाचा आपल्या इलेक्ट्रिक कारसंदर्भातील निर्णय
  • टेस्लाने तब्बल 11 लाख कार परत मागवल्या
  • कारच्या विंडोशील्डमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने घेतला निर्णय

Tesla Recalls 11 Lakh Cars : न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला ही कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कारसाठी प्रसिद्ध आहे. टेस्लाच्या (Tesla)इलेक्ट्रिक कारच्या तंत्रज्ञानाची चर्चाही होत असते. मात्र आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारच्या (Electric car) बाबतीत एक धक्कादायक निर्णय टेस्लाने घेतला आहे. टेस्लाने तब्बल 11 लाख कार परत मागवल्या आहेत. विंडोशील्डमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आल्याने या एक लाख कार कंपनीने परत मागवल्या आहेत. या टेस्ला कारच्या खिडक्या बंद करताना काही गोष्टी ओळखण्यात चूक होते आहे आणि त्यातून समस्या निर्माण होते आहे. ज्यामुळे 'वाहनातील प्रवाशांना त्रास होऊ शकतो.' असे टेस्लाचे म्हणणे आहे. कंपनीने परत मागवलेल्या या कारमध्ये 2017-2022 मॉडेल 3, 2020-2021 मॉडेल Y आणि 2021-2022 मॉडेल S आणि मॉडेल X कारचा समावेश आहे. टेस्लाचे म्हणणे आहे की ते प्रभावित वाहनांसाठी ओव्हर-द-एअर (OTA) फर्मवेअर अपडेट जारी करतील. यामुळे वाहनाच्या स्वयंचलित विंडो रिव्हर्सल सिस्टमच्या वर्तनात सुधारणा होईल. (Tesla recalled 11 lakh cars due to problem in windoshield)

अधिक वाचा :   मुंबई इंडियन्सच्या या स्टारची धमाल, ६ बॉलमध्ये ठोकले ५ सिक्स

खिडकीच्या काचा बंद होताना समस्या

अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ला गुरुवारी सादर केलेल्या सेफ्टी रिकॉल अहवालात, टेस्लाने म्हटले की, 12 सप्टेंबर रोजी कंपनीने निर्धारित केले की चाचणी परिणामांमध्ये पिंच डिटेक्शन आणि रिटेक्शन परफॉर्मन्स  "स्प्रिंग फोर्स आणि  रॉड कॉन्फिगरेश्या आधारावर  FMVSS 118, कलम 5 (स्वयंचलित रिव्हर्सल सिस्टम) च्या आवश्यकता ओलांडल्या. त्यामुळेच टेस्लाने स्वतःहून वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाने सांगितले की जर कारची खिडकी बंद होत असताना अडथळा निर्माण झाल्यास त्यामुळे लोकांना दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो.

अधिक वाचा : Accident : उद्धव ठाकरे गटातील खासदाराच्या गाडीला समोरून एका गाडीने दिली धडक

टचस्क्रीनची समस्या

मे महिन्यात टेस्लाने सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) जास्त गरम झाल्यामुळे टचस्क्रीनची समस्या दूर करण्यासाठी 1,30,000 कार परत मागवल्या होत्या. या गाड्यांमध्ये, सीपीयू जास्त गरम झाल्यामुळे कारची टचस्क्रीन पूर्णपणे ब्लॅंक होण्याची समस्या होती. त्यानंतर, कंपनीने नुकतेच प्रभावित वाहनांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ओव्हर-द-एअर अपडेट (OTA) जारी केले. यामध्ये 2022 मॉडेल 3, Y,2021 आणि 2022 मॉडेल X आणि S यांचा समावेश आहे.

अधिक वाचा :  Ind vs Aus: दुसरा T20 सामना कधी आणि कुठे पाहता येईल LIVE? 

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ विस्तारते आहे. अनेक आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात लॉंच केल्या आहेत. याता टाटा मोटर्स आघाडीवर आहे. आगामी काळात अनेक कंपन्यांची नवनवीन मॉडेल बाजारात येणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध होणार असून अनेक सूट किंवा सवलतीदेखील मिळणार आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांना अनुकूल वातावरण निर्माण होत असून मागील काही महिन्यात ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना मोठी पसंती दाखवली आहेत. चारचाकी आणि दुचाकी श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनांचा खप देशात वाढला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी