zero-emission electric bus । शून्य  प्रदुषण करणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसचा लांब पल्ल्याचा प्रवास आता प्रत्यक्षात 

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक बस ऑपरेटर, EveyTrans प्रायव्हेट लिमिटेडने ( MEIL समूह कंपनी ) बुधवार पासून पुणे ते मुंबई दरम्यान "पुरीबस" नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू केली आहे.

इलेक्ट्रिक बसेसचा लांब पल्ल्याचा प्रवास आता प्रत्यक्षात 
The long haul of zero-emission electric buses is now a reality 
थोडं पण कामाचं
  • EVey Trans (MEIL ग्रुपची उपकंपनीच्या) PuriBus सेवेला सुरूवात 
  •  पुणे-मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बस सेवेत दाखल
  • EVey ट्रान्स द्वारे  सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवासाचे स्वप्न  आता वास्तवात आले आहे.

पुणे : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक बस ऑपरेटर, EveyTrans प्रायव्हेट लिमिटेडने ( MEIL समूह कंपनी ) बुधवार पासून पुणे ते मुंबई दरम्यान "पुरीबस" नावाने इंटरसिटी बस सेवा सुरू केली आहे. ही आंतर-शहर सेवा भारतात प्रथमच सुरू करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर विजयादशमीच्या (दसरा) शुभमुहुर्तापासून  बसच्या नियमीत प्रवासफेऱ्या सुरू होतील. EVey ट्रान्स द्वारे  सुरु होणाऱ्या या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा, शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक प्रवासाचे स्वप्न  आता वास्तवात आले आहे. (The long haul of zero-emission electric buses is now a reality)

भारत सरकार FAME I आणि FAME 2 धोरणातंर्गत दोन शहरादरम्यानच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक बसचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे.

EveyTrans चे महाव्यवस्थापक श्री संदीप रायजादा यांनी पुरीबसच्या फायद्यांचा उल्लेख करताना सांगितले की, "भारतामध्ये आंतर-शहर ई-बस सेवा सुरू  करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पुरीबस 350 किमी पर्यंत प्रवास एका चार्ज मध्ये करू शकते. दीर्घकाळ खर्चात बचत होत असल्याने इ-बसचा शून्य-उत्सर्जनासह अतिशय किफायतशीर आंतर-शहर प्रवास ऑपरेटरच्या व्यवसायासाठी उत्तम पर्याय आहे,  "

12 मीटर लांब पुरीबस

शून्य-उत्सर्जन, इलेक्ट्रिक इंटरसिटी कोच बसमध्ये 45+चालक+सह-चालक इतक्या व्यक्ती बसू शकतात. मन प्रसन्न करणाऱ्या आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. प्रत्येक सीट जवळ एक इन-बिल्ट यूएसबी चार्जर आहे.  पाच क्यूबिक मीटर सामान  राहू शकेल एवढी डीकी या बसला देण्यात आली आहे. 

डिझेल बसच्या तुलनेत कमी देखभाल आणि प्रती किमी कमी  खर्चामुळे पुरीबस आंतर-शहर बस ऑपरेटर्सना चांगला आर्थिक परतावा देते. Li-ion फॉस्फेट बॅटरी ई-बसला उर्जा पुरवते. ट्रॅफिक आणि प्रवासी भार यांच्या भारांकानूसार एका चांर्जीगवर बस 350 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. भारतात  ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या बस तयार करते. 

बसमध्ये अनेक सुरक्षा प्रणाली आहेत, ज्यात TUV प्रमाणीत EU मानाकींत FDSS प्रणाली, भारतीय मानकानुसार बनवलेली  ADAS प्रणाली (प्रगत चालक सहाय्य प्रणाली) आणि ITS प्रणाली समाविष्ट आहे. बसमध्ये संकट समयी उपयोगात येणारे पॅनीक अलार्म सिस्टम आणि आपत्कालीन प्रकाश इत्यादींची व्यवस्था  करण्यात आली आहे. बसमध्ये बसवलेले डीफ्रॉस्टर धुक्यात वाहन चालवताना चालकाची दृश्यमानता सुधारण्यास मदत करतात. 
EveyTrans सुरत, सिल्वासा, गोवा, देहरादून इत्यादी अनेक शहरांमध्ये यशस्वीरित्या ई-बस चालवत आहे. ताफ्यात पुरीबसची भर पडल्याने EveyTrans पुन्हा एकदा प्रवाशांना उत्तम आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यास सिध्द झाली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी