First Maruti 800 Car : ही आहे भारतातील पहिली मारुती 800, 39 वर्ष जुनी, पहिल्या कारची कहाणी...पाहा फोटो

First Maruti 800 : मारुती कार म्हटली की आजही भारतीयांच्या मनात असंख्य आठवणी येतात. सर्वसामान्य माणसाची पहिली कार म्हणजे मारुती 800 (Maruti 800). अगदी एखाद्या व्यावसायिकापासून ते अगदी सचिन तेंडुलकरपर्यत (Sachin Tendulkar) अनेकांची पहिली कार ही मारुती 800 असायची. या कारइतकी लोकप्रियता, प्रतिष्ठा आणि लोकांच्या ह्रदयातील स्थान क्वचितच एखाद्या वाहनाला मिळाले असेल. आजही मारुती हे वाहनांच्या क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे.

First Maruti 800 Car
पहिली मारुती 800 कार 
थोडं पण कामाचं
  • मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या पहिल्या कारचे नूतनीकरण केले
  • 39 वर्ष जुनी मारुती 800 कार नवीन दिसू लागली
  • हरपाल सिंग यांनी ही मारुती 800 कार 47,500 रुपयांना विकत घेतली होती.

Story of India's First Maruti 800 : नवी दिल्ली: मारुती कार म्हटली की आजही भारतीयांच्या मनात असंख्य आठवणी येतात. सर्वसामान्य माणसाची पहिली कार म्हणजे मारुती 800 (Maruti 800)अगदी एखाद्या व्यावसायिकापासून ते अगदी सचिन तेंडुलकरपर्यत (Sachin Tendulkar) अनेकांची पहिली कार ही मारुती 800 असायची. या कारइतकी लोकप्रियता, प्रतिष्ठा आणि लोकांच्या ह्रदयातील स्थान क्वचितच एखाद्या वाहनाला मिळाले असेल. आजही मारुती हे वाहनांच्या क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. मारुती सुझुकीला आता जवळपास 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. (The story of first Marti 800 car of India, see the photo of renovated car)

अधिक वाचा : New RBI Rule : डेबिट, क्रेडिट कार्डसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचा नियम 1 ऑक्टोबरपासून बदलणार, पाहा तुमच्यावरील परिणाम

मारुती कारची सुरूवात

मारुती कारची सुरूवात आणि सुरूवातीची प्रवासदेखील रंजक आहे. त्यातही देशातील पहिलीवहिली मारुती 800 म्हणजे जतन करण्यासारखीच गोष्ट. मात्र देशातील पहिली मारुती 800 कार कोणी विकत घेतली होती ते माहिती आहे का? 1983 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मारुती उद्योगातील पहिली कार मारुती 800 लाँच केली. ही पहिली मारुती 800 दिल्लीचे रहिवासी हरपाल सिंग (Harpal Singh) यांनी विकत घेतली होती. या कारला 39 वर्षे झाली आहेत. सध्या ही पहिली वहिली मारुती कार पुन्हा एकदा नूतनीकरण करून मारुती सुझुकी कंपनीने दिल्लीतील मुख्यालयात ठेवली आहे. आपल्या उत्तुंग यशाचे पहिले पाऊल दाखवण्यासाठी कंपनीने ती शोकेसमध्ये मांडली आहे. गंमत म्हणजे ही 39 वर्षे जुनी पहिली मारुती 800 कार अजूनही 39 वर्षांपूर्वी दिसायची तशीच दिसते. 

अधिक वाचा : Sonali Phogat: तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्या सोनाली फोगाट, शरीरावरील जखमांनी तपासाला दिली नवी दिशा

काय आहे या पहिल्या मारुती 800 कारची कथा

आता मारुती उद्योगाचे रुपांतर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड मध्ये झाले आहे. मात्र या यशोगाथेची सुरूवात म्हणजे पहिली मारुती 800 कार कशी विकण्यात आली ते पाहूया. 14 डिसेंबर 1983 रोजी हरपाल सिंग यांना पहिल्या मारुती 800 कारच्या चाव्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लॉन्च केल्यानंतर दिल्या होत्या. त्यावेळी हरपाल सिंगने 47,500 रुपयांना मारुती 800 खरेदी केली होती. या हॅचबॅकची निर्मिती मारुती उद्योग लिमिटेड नावाच्या कंपनीने केली आहे. मारुतीने हरियाणामध्ये उत्पादन प्रकल्प उभारला होता. 2010 मध्ये हरपाल सिंग यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यानंतर त्यांच्या कारची तितक्या व्यवस्थितरित्या काळजी घेतली जात नव्हती.

अधिक वाचा : LIVE मॅच दरम्यान स्टेडियममध्येच दाम्पत्याचे शारीरिक संबंध, 6 सेकंदांच्या VIRAL VIDEO ने खळबळ

अनेकांच्या ह्रदयातील कार म्हणजे मारुती 800 

हरपाल सिंग यांनी नंतर कारचे नूतनीकरण करण्यासाठी मारुतीशी संपर्क साधला आणि त्यानंतर मारुती सुझुकीने कारचा कायापालट केला आणि ती 39 वर्षांपूर्वीची होती तशी बनवली. यानंतर पहिली मारुती 800 दिल्लीतील मारुती सुझुकी मुख्यालयात जगासमोर मांडण्यात आली. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी भूतकाळातील पहिल्या मारुती 800 च्या नूतनीकरण केलेल्या मॉडेलसह एक फोटो शेअर केला आहे. मारुती उद्योग लिमिटेड आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनमध्ये कालांतराने भागीदारी झाली आणि 1990 पर्यंत सुझुकीचा बाजारातील हिस्सा 50 टक्क्यांपर्यंत वाढला आणि नंतर ही प्रसिद्ध कंपनी मारुती सुझुकी बनली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी