टोयोटा इनोव्हा क्रिस्टा झाली महाग, इतकी वाढली किंमत

भ्रूममभ्रूमम
Updated Jun 04, 2020 | 18:02 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

टोयोटा इनोव्हाच्या एन्ट्री लेवल व्हेरियंटची किंमत आता २५ ते ३० हजार रुपयांनी वाढवली आली असून, डिझेल ऑटोमॅटिक जीएक्सच्या किंमत ६१ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

The Toyota Iniva Krista became more expensive
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा झाली महाग, एवढी वाढली किंमत  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • डिझेल ऑटोमॅटिक जीएक्सची किंमत ६१ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे
  • कोरोनामुळे ऑटो क्षेत्रावर आर्थिक संकट
  • बीएस-४ गाड्या विकण्याचा मोठा प्रश्न

दिल्लीः टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही गाडी आता महाग झाली आहे. फॉर्च्यूनर एसयूव्ही नंतर कंपनीने आता या पॉप्युलर एमपीव्ही (मल्टी परपज व्हीइकल) ची किंमत वाढवली आहे. किंमतीत वाढ केल्यानंतर आता इनोव्हा क्रिस्टाच्या पेट्रोल मॉडलची किंमत १५.६६ लाखांपासून ते २१.७८ लाखांपर्यंत तर डिझेलच्या मॉडलची किंमत १६.४४ लाख ते २३.६३ लाख रुपयांदरम्यान झाली आहे.

टोयोटा इनोव्हाच्या एन्ट्री लेवल व्हेरियंटची किंमत आता २५ ते ३० हजार रुपयांनी वाढवण्यात आली असून, डिझेल ऑटोमॅटिक जीएक्सच्या किंमत ६१ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्य व्हेरियंट्सच्या किंमतीत जवळपास ४४ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इनोव्हा ७ सीटर आणि ८ सीटर ऑप्शन या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

इन्होवाची पावर

दरम्यान इनोव्हा गाडी पेट्रोल आणि डिझेल, या दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये देण्यात आलेले २.७ लिटर पेट्रोल इंजिन १६६ पीएसचे पॉवर आणि २४५ एनएम टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन २.४ लिटरचे आहे. जे १५० पीएसचे पॉवर जनरेट करते. दोन्ही इंजिनमध्ये ५ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे पर्याय उपलब्ध आहेत.

डिझेल मॉडलची नवी किंमती

८ सीटरची किंमत २०.९४ लाख रुपये आहे. झेड एक्स मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत २२.४३ लाख रुपये झाली आहे. झेड एक्स ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत २३.६३ लाख रुपये झाली आहे. जी मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १६.४४ लाख रुपये तर ८ सीटरची किंमत १६.४९ लाख रुपये आहे. G+ मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १७.९ लाख रुपये तर ८ सीटरची नवी किंमत १७.१४ लाख रुपये. जिएक्स ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत १८.७८ लाख तर ८ सीटरच्या कारची किंमत १८.८३ लाख रुपये आहे. व्हीएक्स मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत २०.८९ लाख रुपये आहे. जीएक्स मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १७.४७ लाख रुपये तर ८ सीटरची किंमत १७.५२ लाख रुपये झाली आहे. 

पेट्रोल मॉडेल गाडीची किंमत

जीएक्स मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १५.६६ लाख रुपये तर ८ सीटरच्या कारची किंमत १५.७१ लाख रुपये आहे. जीएक्स ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत १७.२ लाख रुपये, ८ सीटरची किंमत १७.७ लाख रुपये, व्हिक्स मॅन्युअलच्या ७ सीटरची किंमत १९ लाख रुपये करण्यात आली आहे. झेडएक्स ऑटोमॅटिकच्या ७ सीटरची किंमत २१.७८ लाख रुपये करण्यात आली आहे.

कोरोनामुळे ऑटो क्षेत्रावर आर्थिक संकट

कोरोनामुळे ऑटो क्षेत्रावर आलेले आर्थिक संकट वर्षभर राहणार आहे. विक्रीवर आघात झाल्याने मोठ्या डीलर्सलाही मासिक खर्च चालविणे कठीण होणार आहे. मार्च महिन्यात अनेकांनी दुचाकी आणि कारचे बुकिंग केले आहे. पण त्यातील कितीजण डिलिव्हरी घेतात, याचे उत्तर लॉकडाऊननंतर मिळणार आहे. बँकांनी तीन महिन्याचे हप्ते थांबविले असले तरीही कर्जावरील व्याज सुरूच आहे. संकटात असलेल्या या क्षेत्राला उभारी देण्यासाठी बँकांनी कमी व्याजदरात कर्ज द्यावे आणि पूवीर्चे व्याज माफ करावे आणि शासनाने प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा, असे पी.के. जैन यांनी सांगितले.

बीएस-४ गाड्या विकण्याचा मोठा प्रश्न

दुसरीकडे बीएस-४ च्या नियमाने डीलर्सचा व्यवसाय जानेवारीपासून मंदीत आहे. बीएस-६ च्या गाड्या खरेदीसाठी ग्राहकांनी बीएस-४ ची खरेदी थांबविली आहे. १५ मार्चपर्यंत गाड्यांची थोडीफार विक्री झाली, पण १९ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने डीलर्सकडे असलेल्या गाड्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. बीएस-४ गाड्यांना ३० एप्रिलपर्यंत आरटीओकडे नोंदणीची मुदत दिली असली तरीही एप्रिलमध्ये शोरूम बंद असल्याने दुचाकी आणि चारचाकीची विक्री झालीच नाही. त्यामुळे नोंदणीचा प्रश्नच नाही. त्यामुळे बीएस-४ च्या गाड्या डीलर्सकडे विक्रीविना पडून राहणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी