Akash Ambani Favorite Cars : आकाश अंबानीला आवडतात या 4 आलिशान गाड्या, पाहा गाड्यांची किंमत आणि खासियत...

Akash Ambani Luxury Car : रिलायन्सच्या भावी वारसदारांपैकी एक आणि मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) मोठा मुलगा असलेल्या आकाश अंबानीला आलिशान गाड्यांचा छंद आहे. आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्यावर मुकेश अंबानी यांनी जिओची जबाबदारी सोपोवली आहे. जिओच्या (Jio) यशाचे श्रेय आकाशलाच जाते. आकाशला खूप साधे राहणी आवडते. मात्र, तो महागड्या कारमधून फिरणे पसंत करतो. अंबानीच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्यांचा(Luxury cars) ताफा आहे. मात्र आकाश अंबानीला चार कार जास्त आवडतात.

Akash Ambani Favorite Cars
आकाश अंबानीच्या आवडत्या आलिशान कार 
थोडं पण कामाचं
  • मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) मोठा मुलगा असलेल्या आकाश अंबानीला आलिशान गाड्यांचा छंद आहे.
  • जिओच्या (Jio) यशाचे श्रेय आकाशलाच जाते.
  • आकाशला खूप साधे राहणी आवडते. मात्र, तो महागड्या कारमधून फिरणे पसंत करतो.

Akash Ambani Favorite Cars : नवी दिल्ली : रिलायन्सच्या भावी वारसदारांपैकी एक आणि मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) मोठा मुलगा असलेल्या आकाश अंबानीला आलिशान गाड्यांचा छंद आहे. आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्यावर मुकेश अंबानी यांनी जिओची जबाबदारी सोपोवली आहे. जिओच्या (Jio) यशाचे श्रेय आकाशलाच जाते. आकाशला खूप साधे राहणी आवडते. मात्र, तो महागड्या कारमधून फिरणे पसंत करतो. अंबानीच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्यांचा(Luxury cars) ताफा आहे. मात्र आकाश अंबानीला चार कार जास्त आवडतात. आकाशला सर्वात जास्त आवडणाऱ्या 4 मॉडेल्समध्ये बेंटले बेंटायगा, रेंज रोव्हर वोग, बीएमडब्ल्यू 5-सीरीज आणि लॅम्बोर्गिनी उरुस यांचा समावेश आहे. या सर्व कारची किंमत आणि त्यांची खास वैशिष्ट्ये पाहूया. (These are 4 Favorite luxury cars of Akash Ambani)

अधिक वाचा : Hartalika 2022 Aarti: हरितालिकेच्या दिवशी करा 'ही' आरती, माता पार्वती होईल प्रसन्न

आकाश अंबानीच्या आवडत्या आलिशान कार-

1. बेंटले बेंटायगा (Bentley Bentayga)
ब्रिटीश कार उत्पादक कंपनीची सुपरकार बेंटले बेंटायगा ही आकाश अंबानीच्या आवडत्या कारपैकी एक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तो अनेकदा त्याचा भाऊ अनंत अंबानीसोबत हिरव्या रंगाच्या बेंटले बेंटायगा या आलिशान कारमध्ये दिसला आहे. विशेष म्हणजे त्यांची तीन वेगवेगळी मॉडेल्स आहेत. यापैकी एक W12 इंजिन असलेली आहे, तर दुसरे V8 इंजिन असेलली आहे. तिसरे आणि नवीन मॉडेल बेंटले बेंटायगा हे भारतातील पहिले फेसलिफ्ट आहे. त्याची किंमत सुमारे 4.1 कोटी रुपये आहे. दिल्लीत या लक्झरी एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 3.85 कोटी रुपये आहे.

अधिक वाचा : Fasting Tips for Pregnant Women : गरोदरपणात ठेवतांय हरतालिकेचे व्रत, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

2. रेंज रोव्हर वोग (Range Rover Vogue)
रेंज रोव्हर वोग ही बॉलीवूडमधील सर्वात लाडकी कार मानली जाते. शाहरुख खान, संजय दत्त, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांसारख्या अनेक स्टार्सच्या जवळपास लँड रोव्हरचे रेंज रोव्हर्स आहेत. ही आलिशान कारही आकाशची आवडती कार आहे. आकाश आणि अनंत अंबानी दोघेही रेंज रोव्हर वोगचे मालक आहेत. या मॉडेलमध्ये LR-TDV6 3.0L डिझेल इंजिन आहे. ते 296 bhp ची कमाल पॉवर आणि 650 Nm टॉर्क निर्माण करते. वेरिएंटनुसार त्याची किंमत वेगवेगळी आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 2.01 कोटी ते 4.19 कोटी आहे.

3. बीएमडब्ल्यू 5-सेरिज (BMW 5-series)
आकाशकडे BMW 5-सीरीज देखील आहे. ही एक मोठी आणि लक्झरी सेडान आहे. ही कार चार-सिलेंडर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह देखील येते. ही पाच आसनी कार शक्तिशाली इंजिन आणि 8-स्पीड गिअरबॉक्ससह येते. 530d M स्पोर्ट व्हेरियंट 261 bhp कमाल पॉवर आणि 620 Nm कमाल टॉर्क निर्माण करतो. या कारमध्ये आकाश अंबानी त्याची आई नीता अंबानी आणि बहीण ईशा अंबानीसोबत दिसले आहे. एवढेच नाही तर सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार तो कतरिना कैफसोबतही दिसला आहे.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022: मस्तकहीन गणेशाची केली जाते पूजा, केदारनाथजवळ आहे हे रहस्यमय बाप्पाचे मंदिर

4. लॅम्बोर्गिनी उरुस (Lamborgini Urus)
इटालियन कार उत्पादक लॅम्बोर्गिनीची ही एक सुपर स्पोर्ट्स कार आहे. या आलिशान कारला सर्वप्रथम अंबानी कुटुंबाने त्यांच्या गॅरेजमध्ये स्थान दिले होते. आकाश अनेकदा ही कार चालवताना दिसला आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, तो या कारमध्ये रणबीर कपूरसोबत दिसला होता. या कारमध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 641 Bhp पॉवर आणि 850 Nm टॉर्क जनरेट करते. . लॅम्बोर्गिनी उरूसची किंमत 3.15 कोटी ते 3.43 कोटी रुपयांदरम्यान आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी