Best mileage CNG Cars : नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनांच्या दरवाढीने (Fuel price hike) सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक पेट्रोल किंवा डिझेलऐवजी इतर इंधनांवर चालणाऱ्या वाहनांकडे वळत आहेत. तुमचीही व्यथा हिच असेल तर तुमच्यासाठी आम्ही सांगत असलेल्या कार उपयुक्त ठरू शकतात. अलिकडच्या काही महिन्यांपासून पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कार (CNG Car)खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसतो आहे. अनेक मॉडेल्सवर ६ महिन्यांपर्यंतची प्रतीक्षा सुरू आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाई (Hyundai)या कंपन्यांनी आधीच त्यांचे सीएनजी मॉडेल बाजारात आणलेले आहेत. तर आता टाटा मोटर्सने (Tata Motors)देखील या श्रेणीत प्रवेश केला आहे. येथे आम्ही तुम्हाला देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या (Best mileage CNG Cars) सीएनजी वाहनांबद्दल माहिती देत आहोत. (These are the Best mileage CNG Cars in India with reasonable prices, check details)
अधिक वाचा : World’s biggest SUV | बेडरुम आणि बाथरुम असलेली जगातील सर्वात मोठी, विशालकाय SUV, पाहा व्हिडिओ...
मारुती डिझायर सीएनजीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती डिझायर व्हीएक्सआय सीएनजीची किंमत 8.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर मारुती डिझायर व्हीएक्सआय सीएनजीची किंमत 8.82 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या कारमध्ये 1.2-लिटर K-Series Dualjet इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 71bhp पर्यंत पॉवर आणि 98.5Nm टॉर्क निर्माण करते. मारुती डिझायर सीएनजी कारचा मायलेज 31.12km/kg पर्यंत आहे. सेडान श्रेणीमध्ये ही सर्वोत्तम मायलेज देणारी CNG कार आहे.
अधिक वाचा : Ertiga CNG | फक्त 1.09 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर करा एर्टिगा सीएनजी खरेदी...पाहा दरमहा किती हप्ता
मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजीची किंमत 5.24 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.56 लाख रुपयांपर्यत (एक्स-शोरूम) जाते. मारुती सुझुकी एस-प्रेसोमध्ये 1.0-लिटर इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन CNG मोडवर 58hp पॉवर आणि 78Nm टॉर्क निर्माण करते. ही सीएनजी कार 31km/kg पर्यंत मायलेज देते.
अधिक वाचा : Maruti Suzuki | खूशखबर! मारुती लॉन्च करणार ही 2 नवीन वाहने! मिळतील अप्रतिम वैशिष्ट्ये
सीएनजीवरील मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकी अल्टोचे नाव सर्वात किफायतशीर कारमध्ये समाविष्ट आहे. सीएनजी व्हेरिएंट असलेली अल्टो कार ३१.५ किमी/किलोपर्यंत मायलेज देते. मारुती सुझुकी अल्टो 796 cc, 3 सिलिंडर F8D इंजिन असलेली कार आहे. सीएनजी श्रेणीतील मारुती सुझुकी अल्टोच्या किंमतीची सुरूवात 4,76,500 रुपयांपासून (दिल्ली एक्स-शोरूम) आहे.
मारुती सेलेरियो सीएनजी 1 किलो गॅसमध्ये 35.60 किमी मायलेज देते. मारुती सेलेरियो सीएनजी कारमध्ये 1.0-लिटर K10C DualJet इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन सीएनजीसह 57hp कमाल पॉवर आणि 82.1Nm पीक टॉर्क निर्माण करते. कंपनीने हे मॉडेल फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह लॉन्च केले आहे. Celerio VXi CNG ची एक्स-शोरूम किंमत 6,58,000 रुपये इतकी आहे.