या आहेत भारतातल्या सर्वात स्वस्त स्टायलिश हॅचबॅक कार, लुक असा की महागड्या कारलाही देतात टक्कर

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 17, 2021 | 10:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्याला असे वाटत असेल की हॅचबॅक कार्समध्ये स्टायलिश कार्स नाहीत तर आपण चुकत आहात. भारतात काही परवडणाऱ्या आणि स्टायलिश कार्स आहेत आणि यात बेस्ट इन क्लास फीचर्सही ऑफर केले जात आहेत. जाणून घ्या त्यांच्याबद्दल.

Hyundai i20
या आहेत भारतातल्या सर्वात स्वस्त स्टायलिश हॅचबॅक कार, लुक असा की महागड्या कारलाही देतात टक्कर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • या आहेत आपल्या खिशाला आणि हौसेला परवडणाऱ्या कार
  • पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायांसह येणारी Hyundai i20
  • तीन सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेर्टोल इंजिनची Tata Altroz iTurbo

नवी दिल्ली: भारतात (India) हॅचबॅक कार्समध्ये (hatchback cars) बरेच पर्याय (options) उपलब्ध आहेत. यातील बहुतेक कार्स या छोट्या कुटुंबांना (small families) केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात येतात आणि त्यांचे बाह्यरूपही (external design) सामान्य असते. मात्र आपल्याला असे वाटत असेल की हॅचबॅक कार्समध्ये स्टायलिश कार्स (stylish cars) नाहीत तर आपण चुकत आहात. भारतात काही परवडणाऱ्या (affordable) आणि स्टायलिश कार्स आहेत आणि यात बेस्ट इन क्लास फीचर्सही (best in class features) ऑफर केले जात आहेत. जाणून घ्या आपल्या खिशाला आणि हौसेलाही परवडणाऱ्या अशा कार्सबद्दल.

पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायांसह येणारी Hyundai i20

इंजिन आणि पावरबद्दल बोलायचे झाले तर Hyundai i20मध्ये कंपनी 1.2 कप्पा पेट्रोल इंजिन, 1.5 लीटरचे यूटू सीआरडीआई डिझेल इंजिन आणि 1.0 लीटरचे कप्पा टर्बो जीटीआय पेट्रोल इंजनचा पर्याय देते जे अनुक्रमे 83 पीएसची कमाल पावर आणि 11.7 केजीएमचा टॉर्क, 100 पीएसची पावर आणि 24.5 केजीएमची टॉर्क आणि 120 पीएसची पावर आणि 17.5 केजीएमची टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशHyundai i20नबद्दल बोलायचे झाले तर हे इंजिन क्रमशः 5 स्पीड मॅन्युअल, इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन, 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि डीसीटी ट्रान्समिशन देते. या कारमध्ये आपल्याला सेगमेंट बेस्ट 6 एयर बॅग्स, वेहिकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमरा देण्यात आला आहे. Hyundai i20 ही कार भारतात 679,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आली आहे.

तीन सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेर्टोल इंजिनची Tata Altroz iTurbo

Tata Altroz iTurboमध्ये 1.2लीटर तीन-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा उपयोग करण्यात आला आहे जे 108 बीएचपीची पावर आउटपुट आणि 140 एनएमचा टार्क देते. ट्रान्समिशनसाठी या मॉडेलमध्ये फक्त पाच-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय कंपनीचा दावा आहे की आगामी टाटा अल्ट्रोज़ 18.3 किलो मीटर प्रति लीटरची मायलेज देण्यासाठी सक्षम असेल. Tata Altroz iTurbo ही कार भारतात 5,69,500 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी