ह्युंडाई क्रेटा आणि टाटा पंच यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी येत आहेत ही २ ढासू गाड्या...

जुलै महिन्यात मारुती, ह्युंडाई, महिंद्रा, सिट्रोन आणि ऑडी या कंपन्यांची वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. या महिन्याच्या १२ जुलै रोजी नवीन Audi A8 L सिडान आणि नवीन जनरेशन Hyundai Tucson 13 भारतीय बाजारात दाखल होणार आहे.

ह्युंदाई आणि टाटा पंच कार लाँच
Hyundai creta and tata punch car launch  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • जुलै महिन्यात मारुती, ह्युंडाई, महिंद्रा, सिट्रोन आणि ऑडी या कंपन्यांची वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत.
  • या महिन्याच्या १२ जुलै रोजी नवीन Audi A8 L सिडान आणि नवीन जनरेशन Hyundai Tucson 13 भारतीय बाजारात दाखल होणार आहे.
  • महिंद्रा २१ जुलै रोजी नवीन Scorpio N ऑटोमॅटिक वेरिएंटच्या किंमती जाहीर करणार आहे.

मुंबई: जुलै महिन्यात मारुती, ह्युंडाई, महिंद्रा, सिट्रोन आणि ऑडी या कंपन्यांची वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. या महिन्याच्या १२ जुलै रोजी नवीन Audi A8 L सिडान आणि नवीन जनरेशन Hyundai Tucson 13 भारतीय बाजारात दाखल होणार आहे. दुसरीकडे, महिंद्रा २१ जुलै रोजी नवीन Scorpio N ऑटोमॅटिक वेरिएंटच्या किंमती जाहीर करणार आहे. (These two vehicles are going to launch by Hyundai Creta and Tata Punch )

याशिवाय २० जुलै रोजी दोन मोठ्या गाड्या लाँच होणार आहेत, ज्यात मारुती सुझुकीची मध्यम आकाराची SUV आणि Citroen C3 प्रीमियम हॅचबॅक आहे. याशिवाय मारुतीची विटारा आणि ह्युंडाईची क्रेटाही लवकर बाजारात येत आहेत.

अधिक वाचा : 'या' झाडाच्या शेतीतून करता येईल कोटींची कमाई, पाहा कसे

मारुती विटारा एसयूव्ही (SUV) :

 मारुती सुझुकी कंपनी भारतीय बाजारपेठेत मध्यम आकाराची SUV Vitara सादर करण्यास तयार आहे. ही कंपनी २० जुलै ला बाजारात लॉन्च होणार आहे. मारुती सुझुकीच्या नवीन मध्यम आकाराच्या SUV Vitara मध्ये १.५ लिटर K15C DualJet पेट्रोल युनिट तसेच Toyota चे १.५ लिटर TNGA पेट्रोल युनिट दिसेल, जे सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. ही ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह दिली जाईल. या SUV चे मॅन्युअल व्हेरियंट व्हील ड्राइव्ह सिस्टमसह दिले जाणार आहे. त्याच वेळी, जर आपण किंमतीबद्दल बोललो तर मारुती विटाराची सुरवातपासूनच किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.

अधिक वाचा : नोरा फतेहीच्या साडीतील कातिल अदा

 Citroen C3: सिट्रोन C3

Citroen ची नवीन प्रीमियम हॅचबॅक दोन प्रकारे ऑफर केली जाईल. Live आणि Feel हे दोन प्रकार आहेत. यात दोन इंजिन पर्याय असतील, एक १.२ लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल (११५ Nm सह ८२ PS) आणि दुसरे १.२ लिटर टर्बो पेट्रोल (१९९० Nm सह ११० PS). त्याचे मायलेज हे टर्बो पेट्रोलसाठी १९.४ kmpl आणि साध्या पेट्रोल युनिटसाठी १९.८ kmpl असेल.

अधिक वाचा : उर्फी म्हणते, मी एके दिवशी न्यूड होईन!

 कंपनी Citroen C3 सह अनेक पर्याय आणि अॅक्सेसरीज देखील ऑफर करत आहे. वायरलेस स्मार्टफोन सुविधे सह १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, ४-स्पीकर ऑडिओ सिस्टम, दोन रीअर फास्ट चार्जर आणि फ्रंट यूएसबी चार्जर यासारख्या वैशिष्ट्यांना केवळ टॉप-एंड फील ऑफर केले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी