Toyota Innova Crysta diesel variant price and features: टोयोटा कंपनीने भारतीय बाजारात आपली इनोवा क्रिस्टाचं डिझेल व्हेरिएंट पुन्हा आणलं आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी या एमपीव्हीचं बूकिंग बंद केलं होतं. त्यानंतर कंपनीने इनोवा हायक्रॉस (Innova Hycross) लॉन्च केली. आता कंपनीने अपडेटेड इनोवा क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटच्या किमतींची घोषणा केली आहे. सध्या ही MPV चार व्हेरिएंट्समध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये G आणि GX या दोन व्हेरिएंट्सचा समावेश आहे. टोयोटा इनोवा क्रिस्टा डिझेल व्हेरिएंट 7 आणि 8 सीटरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
हे पण वाचा : व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
या एमपीव्हीची किंमत 19.13 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 7 सीटर G व्हेरिएंटची आहे. बेस व्हेरिएंट इनोवा क्रिस्टा डिझेल 8 सीटर रूमची किंमत 19.18 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. तर GX 7 सीटर व्हेरिएंटची किंमत 19.99 लाख रुपये इतकी आहे आणि GX 8 सीटर मॉडलची किंमत 20.04 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. अद्याप VX आणि ZX व्हेरिएंटच्या किमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीयेत.
हे पण वाचा : चटपटीत भेळपुरी बनवा घरच्या घरी, जाणून घ्या सोपी पद्धत
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
2023 टोयोटा इनोवा क्रिस्टामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह 2.4 लिटर, 4 सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 148bhp ची पावर आणि 360 Nm टॉर्क जनरेट करतं. कंपनीने 2.7 L पेट्रोल इंजिन अपडेटेड मॉडलमधून हटवण्यात आलं आहे. नवी इनोवा क्रिस्टा डिझेल ही 5 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?
याच्या स्टँडर्ड फीचर्स लिस्टमध्ये वायरलेस डोअर लॉक, एमआयडीसह स्पीडोमीटर, पावर विंडो, मॅन्युअल एसी, ब्लॅक फॅब्रिक सीट कवर, फ्रंट वायपर इंटरमिटेंट अँड मिस्ट, फुल व्हील कॅपसह 16 इंच स्टील व्हील, ब्लॅक रेडिएटर ग्रिल आणि मल्टी रिफ्लेक्टर हॅलोजन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी यामध्ये 3 एअरबॅग, वाहन स्टेबिलिटी कंट्रोल, अँटी थेफ्ट सिस्टम इम्मोबिलाएजर, ईबीडीसह एबीएस, हिल स्टार्ट असिस्ट, ब्रेक असिस्ट, सीट बेल्ट वॉर्निंग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टमचा समावेश आहे.