TVS ने मार्वल अ‍ॅव्हेंजर्सवर आधारित स्कूटर केली लाँच, पाहा किंमत 

टीव्हीएस मोटर कंपनीने मंगळवारी मार्वल अ‍ॅव्हेंजर प्रेरित स्कूटर एनटीओआरक्यू 125 सुपरस्कायवीड व्हर्जन बाजारात लाँच केलं आहे.

tvs-bccl
TVS ने मार्वल अ‍ॅव्हेंजर्सवर आधारित स्कूटर लाँच, पाहा किंमत  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: टीव्हीएस (TVS) मोटर कंपनीने मंगळवारी मार्व्हल एवेंजर्स-प्रेरित स्कूटर एनटीओआरक्यू 125 सुपरस्कायवीड व्हर्जन बाजारात लाँच केलं आहे. दिल्लीच्या एका शोरूममध्ये त्याची किंमत 77,865 रुपये आहे. टीव्हीएस मोटरने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या सूचनेत म्हटलं आहे की, कंपनी सुपरस्कायवीड व्हर्जन सादर करण्यासाठी डिस्ने इंडियाच्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स व्यवसायात कंपनीचा सहभाग आहे.

कंपनीने म्हटले आहे की, उत्पादनाच्या डिझाइनद्वारे आम्ही प्रत्येक मार्व्हल सुपर हीरोशी संबंधित एक विशेष व्हर्जन सादर करू. टीव्हीएस मोटर कंपनीचे कॉम्प्यूटर मोटारसायकल, स्कूटर आणि कॉर्पोरेट ब्रँडचे उपाध्यक्ष (मार्केटींग) अनिरुद्ध हल्दर म्हणाले की, आपल्या सर्वांचे आपले आवडते सुपर हिरो असतात. ज्यांच्याशी आपण कनेक्ट असतो. टीव्हीएस एनओआरक्यू 125 सुपरस्कायवीड व्हर्जन याचाच अनुभव आपल्याला प्रदान करेल.

TVS NTorq 125 चे फीचर्स 

TVS NTorq 125 मध्ये  न्यू जेनरेशन CVTi-REVV 124.79cc, सिंगल सिलिंडर, ४-स्ट्रोक, ३-वॉल्व, इंजिन देण्यात आलं आहे. ज्यामुळे यात ९.४ bhp पॉवर आणि १०.५ टॉर्क जनरेट करतं. कंपनीच्या दाव्यानुसार या स्कूटरचा टॉप स्पीड हा ९५ किमी प्रति तास एवढा आहे. 

TVS NTorq मध्ये नेव्हिगेशन असिस्ट, टॉप-स्पीड रेकॉर्डर, इन बिल्ट लॅप-टायमर, सर्व्हिस रिमाइंडर, ट्रिप मीटर, यासारखे अनेक नवनवे फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाइल कनेक्ट झाल्यानंतर या बाइकमध्ये तुम्हाला फोनमधील बॅटरी क्षमता, शेवटचं पार्किंग लोकेशन यासरख्या फीचर्सची देखील माहिती देईल. 

कंपनीचा असा दावा आहे की, लाँचिंगच्या अवघ्या सहा महिन्यानंतरच या स्कूटरची मागणी प्रचंड वाढली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर तब्बल २२ लाख व्हिजिट्स झाल्या आहेत. ग्राहक सतत डीलर चॅनल्स आणि सोशल मीडिया प्लेटफॉर्मच्या माध्यमातून या स्कूटर बाबतची माहिती मिळवण्यास इच्छुक आहेत. 

टीव्हीएस मोटर कंपनी चे उपाध्यक्ष (मार्केटिंग)अनिरुद्ध हल्दर यांनी याबाबत असं म्हटलं की, 'तरुणाईने आमच्या या नव्या बाइकला बरीच पसंती दिली आहे. त्यांनी फक्त ही बाइक खरेदीच केली नाही तर सोशल मीडियावर तिला लोकप्रिय देखील बनवली.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी