Tyre Care Tips in Monsoon : नवी दिल्ली : पावसाळा (Monsoon) हा नेहमी अनेक आव्हाने घेऊन येतो. ही आव्हाने विविध पातळ्यावंरील असतात. रस्त्यावरील वाहतूक आणि वाहन चालवण्यासंदर्भातदेखील पावसाळा नेहमीच आव्हानात्मक असतो. चांगल्या तयारीच्या वाहनचालकांनाही पावसाळ्याच्या दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: अनोळखी रस्त्याच्या कडेला पाणी भरले तर तिथे खड्डा तर नाही ना? अशी भीती वाटत असते. एवढेच नाही तर पावसामुळे चिखल होतो, सर्वत्र पाणी साचते. त्यामुळे अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनेही(Vehicles) रस्त्यावरून घसरण्याचे प्रकार होऊ लागतात. पावसाळ्यात टायर पंक्चर (Tyre puncture)होण्याचा धोकाही वाढतो. रस्त्यांची गिट्टी, माती खचली की त्यामुळे वाहनांच्या टायरला मोठा फटका बसतो आणि त्यात बिघाड निर्माण होतो. मात्र, काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास वाहन घसरून पंक्चर होण्यापासून वाचू शकते. अशाच काही टिप्स (Tyre safety tips) आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. (Tyre tips for monsoon for safe driving, know the tips)
पावसाळ्यात बहुतांश रस्ते खराब होतात. रस्त्याच्या खराब झालेल्या गिट्टीवर टायरची पकड कमकुवत होते. अशा स्थितीत जेव्हा गाडीचा वेग जास्त असतो आणि ब्रेक लावला जातो तेव्हा ती घसरते. अनेक वेळा गाडी घसरल्याने अपघातही होतात. शेताला लागून असलेल्या रस्त्यांवर चिखल झाल्याने घसरण्याची शक्यताही वाढते. अनेकवेळा रस्त्याच्या वळणावर वाळू किंवा खडी टाकल्याने रस्ता निसरडा झालेला असतो. त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता असते.
अधिक वाचा - Hyundai Small Electric Car : ह्युंडाईच्या छोट्या ई-कार लवकर भारतात लॉन्च, कंपनी पाहतेय एकाच गोष्टीची वाट
कोणत्याही वाहनाचे टायर खूपच वापरलेले किंवा घासले गेलेले नसावेत. टायर्समध्ये 3mm थ्रेड असणे आवश्यक आहे. कारण रस्त्यावर या थ्रेडमुळेच चांगली पकड निर्माण होते. टायरमधील हवेचा दाब बरोबर नसेल तर टायर पंक्चर होण्याची शक्यता अधिक वाढते. एवढेच नाही तर वाहन घसरण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे टायरमधील हवेचा दाब अगदी योग्य असावा. टायर्समधली हवा कंपनी सांगेल तितकीच असावी हेही लक्षात ठेवा.
अधिक वाचा - Most Popular Cars : सर्वाधिक मागणी, सर्वात मोठा वेटिंग कालावधी...'या' गाड्यांच्या प्रेमात आहेत ग्राहक
पावसाळ्यात रस्त्यावर गाडीचा वेगही खूप महत्त्वाचा असतो. महामार्गावर वेग 80 किमी प्रति तासापेक्षा जास्त नसावा. जेव्हा वाहनाचा वेग कमी असतो तेव्हा ते पूर्ण नियंत्रणात राहतो आणि घसरण्याचा, अपघात होण्याचा धोकाही टाळता येतो. अशा परिस्थितीत, निसरड्या रस्त्यावर अचानक स्टीयरिंग फिरवू नका. अचानक एक्सीलरेटर वाढवू नका. हळू हळू ब्रेक लावा. जेणेकरुन ब्रेक लावल्यावर वाहन त्याच्या रेषेच्या बाहेर जाणार नाही.
नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, कोकणातील बहुतांश भाग (मुंबईसह), मध्य महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकच्या काही भागात पुढे सरकला आहे. उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरात राज्य, मराठवाडा, तेलंगणाचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.