Car Care Tips: हिवाळ्यात सीएनजी कारसाठी वापरा या टिप्स...होईल मोठी बचत

Car Tips : आता हिवाळ्याचा (Winter) हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना (CNG Car)अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कारण हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे वाहनाच्या टाकीत पडलेला सीएनजी गॅस गोठू शकतो. परिणामी कार सुरू होण्यास अडचण येते. ारची काळजी घेणे, मेंटेनन्स राखणे, ऋतुमानानुसार कारची देखभाल करणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात

Car Tips
कार टिप्स 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात थंडीमुळे कारच्या इंजिनवर परिणाम
  • सीएनजी कारच्या इंजिनकडे विशेष लक्ष देण्याची गरज
  • सीएनजी कारसाठीच्या टिप्स

Winter CNG Car Care Tips :नवी दिल्ली : कार विकत घेतल्यानंतर चालवण्याचा एक वेगळा आनंद असतो. मात्र कारची काळजी घेणे, मेंटेनन्स राखणे, ऋतुमानानुसार कारची देखभाल करणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. आता हिवाळ्याचा (Winter) हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना (CNG Car)अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कारण हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे वाहनाच्या टाकीत पडलेला सीएनजी गॅस गोठू शकतो. परिणामी कार सुरू होण्यास अडचण येते. अशा परिस्थितीत वाहनाची टाकी नेहमी भरलेली ठेवावी किंवा अर्ध्याहून अधिक सीएनजीने चालवावी. ही पद्धत वापरल्याने तुम्ही हिवाळ्यात निर्धास्तपणे वाहन चालवू शकाल शिवाय तुमच्यावरील खर्चाचा भार कमी होत मोठी बचतदेखील होईल. (Use these car tips for CNG vehicle in winter) 

अधिक वाचा : काँग्रेस नेत्याने महाराजांची तलवार आणण्यासाठी केली होती धडपड

हिवाळ्यात सीएनजी कारसाठीच्या टिप्स-

हिवाळ्यात कारची इंधन टाकी का भरलेली ठेवायची

कारच्या इंजिनवर हवामानाचा परिणाम होत असतो. हिवाळ्यात तापमान खूप कमी झाल्यास सभोवतालच्या हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे कारच्या इंधन टाकीमध्ये सीएनजी कमी असल्यास रिकामी जागा थंड हवेने व्यापली जाते. कार किंवा वाहन सुरू केल्यावर, या तेथील हवेत उष्णता वाढते. त्यामुळे त्यातील पाणी इंधन टाकीमध्ये जमा होते. परिणामी तुमच्या कारच्या इंधन पंपाचे नुकसान होते. या कारणास्तव वाहन तज्ज्ञ हिवाळ्यात टाकी भरलेली ठेवण्याचा सल्ला देतात. 

अधिक वाचा : बापाने 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा रचला कट 

सुरक्षेचा मुद्दादेखील महत्त्वाचा 

वाहनाची सुरक्षिता सर्वात महत्त्वाची असते. म्हणूनच हिवाळ्यात तुमच्या वाहनाची गॅस टाकी भरलेली ठेवणे देखील शहाणपणाचे आहे. ऐन थंडीच्या वातावरणात कोणत्याही क्षणी वाहतूक विस्कळीत झाल्यावर तुम्ही एखाद्या ठिकाणी अडकू शकता. कारचे इंजिन बंद पडू शकते. त्याच वेळी, गॅसने भरलेली टाकी कारला सतत उबदार ठेवण्यास मदत करू शकते आणि कोणत्याही काळजीशिवाय तुम्हाला इप्सित स्थळापर्यत पोचवू शकते.

अधिक वाचा : लहान मुलांमध्ये अशी ओळखा डेंग्यूची लक्षणे...लगेच करा उपचार

टायरमधील हवा

टायरच्या दाबाची नेहमी काळजी घ्या. कारच्या सर्व टायरमध्ये नेहमी योग्य दाब असावा. यासाठी आठवड्यातून एकदा तरी टायरमधील प्रेशर तपासणी करण्यात आली आहे याची खातरजमा करा. टायरमध्ये हवा कमी असल्याने मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे हवेचा दाब वेळोवेळी तपासत राहा.

अलीकडच्या काळात वाहन म्हटले की आधी इंधनाचा खर्च डोळ्यापुढे येतो. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) खूप महाग झाले आहे. त्यामुळे कार चालवण्याचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत एखादी कार किंवा वाहन कमी मायलेज देऊ लागली, तर हा खर्च आणखी वाढतो. त्यामुळेच तुमचे वाहन किती मायलेज (Car Mileage) देतंय हेदेखील महत्त्वाचे ठरते. 

कार विकत घेताना बजेट, कारची वैशिष्ट्ये, ट्रेंड या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. अनेकवेळा कंपन्या कारमध्ये अशी वैशिष्ट्ये वापरतात ज्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त आकर्षित होतील. मात्र अनेक वैशिष्ट्ये अशी असतात ज्यांचा वापर ग्राहकांकडून फारसा केला जात नाही परंतु त्यासाठी ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी