Car Mileage: नवी दिल्ली : अलीकडच्या काळात वाहन म्हटले की आधी इंधनाचा खर्च डोळ्यापुढे येतो. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) खूप महाग झाले आहे. त्यामुळे कार चालवण्याचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत एखादी कार किंवा वाहन कमी मायलेज देऊ लागली, तर हा खर्च आणखी वाढतो. त्यामुळेच तुमचे वाहन किती मायलेज (Car Mileage) देतंय हेदेखील महत्त्वाचे ठरते. म्हणूनच, आपण अशा काही टिप्स (Car Mileage Tips) जाणून घेऊया ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या कारचे सर्वोत्तम मायलेज मिळवू शकता. पुढे दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास तुमच्या कारचे मायलेज वाढण्यास मदत होईल. तसे पाहिले तर कारचे मायलेज मुख्यत्वे ड्रायव्हिंगचा मोड, ड्रायव्हिंगचे ठिकाण यासह अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मात्र काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास तुम्ही फायद्यात राहू शकाल. (Use these tips to increase mileage of your car)
अधिक वाचा : Face Beauty Tips: या 3 नैसर्गिक गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल चमक...दिसाल तरुण आणि सुंदर
कोणतेही वाहन चालवताना सर्वात महत्त्वाचे ठरणाऱ्या बाबी म्हणजे क्लच आणि ब्रेक. क्लच आणि ब्रेकचा योग्य वापर करा. गाडी चालवताना क्लचवर पाय सतत ठेवू नका, त्याचा विपरित परिणाम होत वाहनाचे मायलेज कमी होते. त्याचबरोबर गाडी योग्य गिअरमध्ये चालवा. सतत लहान गीअरमध्ये जास्त आरपीएमवर गाडी चालवल्याने देखील कमी मायलेज होते. आवश्यक असेल तिथेच ब्रेक लावा कारण जेव्हा तुम्ही ब्रेक लावल्यानंतर पुन्हा वेग वाढवता त्यावेळेस वाहनाचे मायलेज कमी होते.
अधिक वाचा : Indian Railways Update: रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, तुमचा प्रवास होणार अधिक सुखकारक
टायरच्या दाबाची नेहमी काळजी घ्या. कारच्या सर्व टायरमध्ये नेहमी योग्य दाब असावा. यासाठी आठवड्यातून एकदा तरी टायरमधील प्रेशर तपासणी करण्यात आली आहे याची खातरजमा करा. टायरमध्ये हवा कमी असल्याने मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे हवेचा दाब वेळोवेळी तपासत राहा.
तुमच्या कारने चांगले मायलेज द्यावे यासाठी वेग कायम ठेवा म्हणजे वेगात सातत्य ठेवा. म्हणजेच कार फक्त एकाच वेगाने चालवण्याचा प्रयत्न करा. वारंवार वेग कमी करून नंतर वेग वाढवल्याने मायलेज कमी होते. तसेच, खूप जोरात वेग वाढवू नका. हायवेवर चांगल्या मायलेजसाठी तुम्ही 70 ते 90 किमी प्रति तासच्या वेगाने वाहन चालवू शकता.
अधिक वाचा : LIVE मॅच दरम्यान स्टेडियममध्येच दाम्पत्याचे शारीरिक संबंध, 6 सेकंदांच्या VIRAL VIDEO ने खळबळ
गाडीची योग्य प्रकारे देखभाल करा. वेळेवर कारची सर्व्हिसिंग करत रहा. त्यामुळे मायलेज वाढण्यास मदत होईल. गाडी नवीन असो वा वापरलेली असो, वेळेवर सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. वर्षातून किमान एकदा किंवा 10 हजार किलोमीटर चालल्यानंतर कारची सर्व्हिसिंग करा.
इंधनाच्या दरातील वाढीमुळे ग्राहक जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या वाहनांना प्राधान्य देतात. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यादेखील जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या कार बाजारात आणत असतात. आगामी काळातदेखील इंधनाचा खर्च हा वाहनांच्या निवडीमागील मुख्य निकष असणार आहे.