Maruti Suzuki च्या 'या' टॉप सेलिंग कारची नवी जबरदस्त आवृत्ती होणार लॉंच

Maruti Suzuki | मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या ग्राहकांसाठी दमदार मॉडेल बाजारात आणणार आहे. अलीकडेच माहिती समोर आली होती की मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) सीएनजी मॉडेल या महिन्याच्याअखेरपर्यत बाजारात लॉंच केले जाऊ शकते. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार फेबुवारी महिन्यात कोणत्याही दिवशी मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्टच्या (Maruti Suzuki Baleno facelift) किंमतीची घोषणा केली जाऊ शकते.

Maruti Suzuki Baleno facelift
मारुती सुझूकी बलेनो फेसलिफ्ट 
थोडं पण कामाचं
  • मारुती सुझूकी आणणार नवीन मॉडेल
  • मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट येणार बाजारात
  • मारुतीकडून यावर्षी अनेक घोषणांची शक्यता

Maruti Suzuki Baleno facelift | नवी दिल्ली : यावर्षी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या ग्राहकांसाठी दमदार मॉडेल बाजारात आणणार आहे. अलीकडेच माहिती समोर आली होती की मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) सीएनजी मॉडेल या महिन्याच्याअखेरपर्यत बाजारात लॉंच केले जाऊ शकते. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार फेबुवारी महिन्यात कोणत्याही दिवशी मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्टच्या (Maruti Suzuki Baleno facelift) किंमतीची घोषणा केली जाऊ शकते. अर्थात कंपनीने यासंदर्भातील तारीख जाहीर केलेली नाही. (Very soon Maruti Suzuki Baleno Facelift will be launched in India)

मारुती सुझुकी बलेनो 

मारुती सुझुकी बलेनो भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. दोन वर्षांपूर्वी या मॉडेलचे मिड लाइफ अपडेटेड व्हर्जन बाजारात आणण्यात आले होते. आता नवीन कारमध्ये अनेक मोठे बदल दिसू शकतात. या नव्या सुविधा फक्त इंटेरियरमध्येच नाहीत तर बाह्य रुपातदेखील दिसणार आहेत. अर्थात सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत यात मेकॅनिकल पातळीवर फारच कमी बदल होण्याची शक्यता आहे.  

मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट

मारुती सुझूकी बलेनो ही देशातील लोकप्रिय कारपैकी एक कार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार २०२२ मारुती बलेनो फेसलिफ्ट मध्ये मोठा ग्रिल, नवे रॅप अराउंड हेडलॅम्प्स, नवीन एलईडी डीआरएल सिग्नेचर्स, रिवाइज्ड फ्रंट बंपर आणि नवे फॉग लॅम्पसारखे फिचर्स पाहण्यास मिळू शकतात. मारुती सुझूकी बलेनोमध्ये रियर बाजूस नवीन टेल लॅम्प, नवीन बंपर टॅगलेटसाठी नवीन डिझाइन असू शकते. मेकॅनिकल पातळीवर मारुती सुझूकीच्या या नव्या कारमध्ये कदाचित कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच या नव्या मॉडेलमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच १.२ लीटर नचरली एसपायरेटेड पेट्रोल इंजिन आणि एक माइल्ड हायब्रीड पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि एक सीव्हीटीचा पर्याय असेल. 

सेलेरियो

याआधी मारुती सुझूकीने नवी सेलेरियो बाजारात आणली होती. याआधीचे सेलेरियोचे मॉडेल बाजारात यशस्वी ठरले होते. सेलेरियो ही एएमटी गियरबॉक्स असणारी पहिली मारुति कार ठरली आहे. मारुतिने आपल्या नव्या सेलेरियोमध्ये अनेक फीचर्स जोडले आहेत आणि हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या कारचे मायलेज आणि किंमत सर्वाधिक चर्चेचे विषय आहेत. नवी सेलेरियो, लेटेस्ट हरटेक्स प्लॅटफॉर्मच्या अनुरुप तयार करण्यात आली आहे. हा नवा प्लॅटफॉर्म कारला हलकी आणि अधिक सुरक्षित बनवते. याशिवाय या कारचे मायलेज चांगले आहे. या कारची लांबी जास्त नाही आणि ३६९५ मिमीचीच लांबी आहे. अर्थात जुन्या सेलेरियोच्या तुलनेत नव्या सेलेरियोची रुंदी जास्त आहे म्हणजेच १६५५ मिमी आहे. जुन्या मॉडेलपेक्षा नवे मॉडेल मोठे आणि अधिक आकर्षक दिसणारे आहे. कारचा ग्राउंड क्लिअरन्स १७० मिमीपर्यत वाढवण्यात आला आहे.

अनेक ऑटोमोबाइल कंपन्या यावर्षी आपले नवे मॉडेल बाजारात आणणार आहेत. त्यामुळे विविध श्रेणींतील कारमध्ये स्पर्धा असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी