Volvo XC40 Recharge: या इलेक्ट्रिक कारची अवघ्या दोन तासांत विक्री फुल, एका चार्जमध्ये धावणार 418KM

Volvo XC40 recharge ev sold in 2 hours: वोल्वोने भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक XC40 Recharge लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे बुकिंग सुरू होताच या गाडीची विक्री दोन तासांत पूर्ण झाली आहे. 

Volvo XC40 recharge
Volvo XC40 recharge 
थोडं पण कामाचं
  • बुकिंग सुरू होताच 2 तासांत विक्री फुल
  • भारतीय बाजारात या गाडीच्या 150 युनिट्सची विक्री

Volvo XC40 Recharge: वोल्वो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी अखेर आपली इलेक्ट्रिक गाडी लॉन्च केली आहे. वोल्वोने आपली XC40 Recharge लॉन्च केली आहे. या गाडीची सुरुवाती किंमत 55.90 लाख रुपये आहे. कंपनीने भारतीय बाजारात यंदाच्या वर्षीय या गाडीच्या केवळ 150 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. ही इलेक्ट्रिक कार संपूर्णपणे भारतातच असेंबल करण्यात येत आहे. तसेच या किमतीसह XC40 रिचार्ज आता देशातील सर्वाधिक लक्झरी कार बनली आहे. कंपनीने बुधवारी सकाळी 11 वाजता आपल्या वेबसाईटवर या कारसाठी बुकिंग सुरू केली आणि अवघ्या दोन तासांतच सर्व गाड्यांची विक्री पूर्ण झाली. (Volvo XC40 recharge launched in indian market and sold out in just 2 hours check price features)

ड्यअल टोन अलॉय

इलेक्ट्रिक एसयूव्हीची फुल्ली लोडेड पी8 एडब्ल्यूडी व्हेरिएंट देशात एकच उपलब्ध केली आहे. या गाडीची डिलिव्हरी ग्राहकांना ऑक्टोबर 2022 पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. फ्युअलवर चालणाऱ्या गाडीपासून इलेक्ट्रिक XC40 ही गाडी वेगळी दिसण्यासाठी XC40 चा बॉडी कलर, ग्रिल आणि वोल्वो बॅज देण्यात आला आहे. तर बाहेरील भागात एलईडी हेडलॅम्प, 19 इंचाचा-ड्युअल टोन अलॉय व्हील्स, मागे आणि पुढील भागात बंपर्सवर ब्लॅक क्लॅडिंग आणि एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहे.

अधिक वाचा : किंमत 5.25 लाख आणि देते 35Km मायलेज! Maruti ची ही स्वस्त कार खरेदीसाठी झुंबड

काय आहेत फिचर्स

वोल्वो इंडियाने नव्या XC40 रिचार्ज 2022 मध्ये अनेक फिचर्स दिले आहेत. ज्यामध्ये डिजिटल 12 इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रिक फ्रंट सीट्ससह मेमरी फंक्शन, अडेप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, 13 स्पीकर्स, म्युझिक सिस्टम आणि टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट देण्यात आलं आहे. एकूण पाहिलं तर या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचं इंटेरिअर दिसण्यासाठी खूपच सुंदर आणि उत्तम क्वॉलिटीचं आहे.

अधिक वाचा : New 2022 Alto: नवीन अल्टोचा धमाका! ग्राहकांमध्ये लॉंचिंग आधीच प्रचंड क्रेझ...विक्रीचे विक्रम मोडण्याची शक्यता

28 मिनिटांत 80 टक्के चार्ज

वोल्वो XC40 Recharge सोबत 78 किलोवॅट अवर बॅटरी पॅक देण्यात आलं आहे. जे 402 bHp ची ताकद आणि 660 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. याची मोटर चारही चाकांना ताकद देते. कंपनीने दावा केला आहे की, ही गाडी एका चार्जवर 418 km पर्यंत चालू शकते. नवी XC40 Recharge ही गाडी 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. या गाडीचा टॉप स्पीड 180 किमी प्रति तास इतका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी