महागड्या, ३४ लाखांच्या 'लिमोझिन'सारखीच दिसते ही फक्त २.२७ लाखांमध्ये बनलेली कार, तुम्हीसुद्धा व्हाल धक्क !

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 12, 2021 | 19:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

या वॅगनआर मिनी-लिमिझिनला ( WagonR mini-limousine)बनवण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला आणि आता हीच कार १२ लाख रुपयांना विकली जाते आहे.

WagonR modified into Limousine
वॅगनआरचे २.२७ लाखात लिमोझिनमध्ये रुपांतर 

थोडं पण कामाचं

  • वॅगनआरचे रुपांतर लिमोझिनमध्ये
  • आयडिया पाकिस्तानात राहणाऱ्या मोहम्मद इरफान उस्मान यांची
  • कार मॉडिफाय करण्याचा खर्च २.२७ लाख

नवी दिल्ली : कोणत्याही कारला मॉडिफाय करणे किंवा मूळ मॉडेलमध्ये बदल करणे ही अलीकडच्या काळात प्रचलित झालेली पद्धत आहे. मात्र एखादी मारुती सुझुकी वॅगन आर (WagonR)सारखी कार मॉडिफाय करून तिचे रुपांतर एका आलीशान लिमोझिनमध्ये (limousine) करणे याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. एरवी कोणाच्याही डोक्यात येणार नाही अशी आयडिया पाकिस्तानात राहणाऱ्या मोहम्मद इरफान उस्मान नावाच्या व्यक्तीने प्रत्यक्षात उतरवली आहे. इरफान यांनी आपल्या छोट्याशा वॅगनआर कारमध्ये फार थोडा खर्च करत तिचे रुपांतर लिमोझिन कारमध्ये केले आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्राचा दांडगा अनुभव

वॅगनआर ही एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. वॅगनआरचे रुपांतर लिमोझिनमध्ये करणारे इरफान दीर्घ काळापासून वाहन उद्योगाशी जोडले गेलेले आहेत. १९७७ मध्ये त्यांनी पाकिस्तानमधील एका कार वर्कशॉपमध्ये आपल्या करियरची सुरूवात केली. त्यानंतर ते नोकरीनिमित्त सौदी अरेबियामध्ये गेले. तिथे त्यांनी ३५ वर्षे काम ऑटोमोबाईल क्षेत्रात काम केले.

आपल्या मनात गेली कित्येक वर्षे वॅगनआर कारला लिमोझिनमध्ये रुपांतरित करण्याची आयडिया होती, मात्र आपण ते करू शकलो नाही, असे इरफान यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानात परत आल्यावर त्यांना आपल्या या अनोख्या आयडियावर काम करण्यासाठीचा वेळ मिळाला. आपला हा प्रोजेक्ट सुरू करण्याआधी त्यांनी हे काम याआधी इतर कोणी केलेले तर नाही ना, याची खातरजमा गुगलवर सर्च करून घेतली. त्यानंतरच त्यांनी आपल्या कामाची सुरूवात केली.

फक्त २.२७ लाखांत तयार झाली लिमोझिन


इरफान यांनी आपल्या प्रोजेक्टसाठी २०१५च्या मॉडेलचा वापर केला आहे. २०१८ मध्ये ही कार पाकिस्तानात आयात करण्यात आली होती. इरफान यांनी या वॅगनआरला मोठी करण्यासाठी कारच्या खऱ्या फ्रंट आणि रिअर भागाचा वापर केला. तर कारची लांबी वाढवण्यासाठी यामध्ये मधला भाग नव्याने जोडण्यात आला आहे. यासाठी सुजुकीच्या ओरिजिनल सुट्या भागांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये मिडल डोर, रुफ, पाईलर्स आणि सीटचा समावेश आहे. वॅगनआरचे रुपांतर लिमोझिनमध्ये करण्यासाठी त्यांना ३ महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी त्यांना ५ लाख पाकिस्तानी रुपये इतका खर्च आला. भारतीय रुपयात याचे रुपांतर केल्यास ही रक्कम जवळपास २.२७ लाख रुपये इतकी होती. 

वॅगनआर मिनी-लिमोझिनचे (WagonR mini-limousine)स्पेसिफिकेशन आणि वैशिष्ट्ये


या कारची एकूण लांबी १४.५ फूट आहे. या कारमध्ये जोडण्यात आलेल्या मिडल सेक्शनची लांबी ३ फूट ७ इंच आहे. याशिवाय या कारमध्ये एकूण ६ लोक बसू शकतात. ही कार एकूण ५०० किलोग्रॅमचे वजन वाहू शकते. मिडल सेक्शनव्यतिरक्त या कारमधील इतर सर्व सुटे भाग हे ओरिजिनल आहेत. यामध्ये ६६० सीसीचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाले इंजिन बसवण्यात आले आहे. इरफान यांनी ही कार १२० किमी प्रति तास या वेगाने चालवल्याचे सांगितले आहे. शिवाय हायवेवर ही कार २० किमी प्रति लिटर आणि शहरात १४ ते १५ किमी प्रति लिटरचा मायलेज देते.

इरफान या कारला २६ लाख पाकिस्तानी रुपयांमध्ये विकत आहेत. भारतीय रुपयांनुसार या कारचे मूल्य १२ लाख रुपये इतके आहे. भारतात नव्या वॅगनआर कारची किंमत ४.४५ लाख रुपयांपासून ते ५.९४ लाख रुपयांपर्यत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी