अपडेटेड 'एर्टिगा' चे काय आहेत फिचर्स अन् काय आहे किंमत; जाणून घ्या जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी?

आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन Ertiga अपडेट करत भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या नवीन एमपीव्हीमध्ये कंपनीने आधीच्या मॉडेलच्या तुलनेत उत्तम डिझाइन, फीचर्स आणि नवीन जनरेशन के-सिरीज इंजिन दिले आहे. जुन्या एर्टिगाच्या तुलनेत, नवीन कार ही अधिक शक्तिशाली आणि मायलेज देणारी आहे.

What are the features of the updated 'Ertiga'? What is the price?
अपडेटेड 'एर्टिगा' चे काय आहेत फिचर्स अन् काय आहे किंमत  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • CNG मॉडेलची किंमत 10.44 लाख ते 11.54 लाख रुपयांदरम्यान आहे.
  • नवीन मारुती एर्टिगा 2022 मध्ये 1.5-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किट देखील उपलब्ध

नवी दिल्ली : आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन Ertiga अपडेट करत भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या नवीन एमपीव्हीमध्ये कंपनीने आधीच्या मॉडेलच्या तुलनेत उत्तम डिझाइन, फीचर्स आणि नवीन जनरेशन के-सिरीज इंजिन दिले आहे. जुन्या एर्टिगाच्या तुलनेत, नवीन कार ही अधिक शक्तिशाली आणि मायलेज देणारी आहे.

काय आहे किंमत 

नवीन 2022 Maruti Ertiga ची किंमत 8.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.79 लाख रुपयांपर्यंत जाते. ही याची एक्स शोरूम किंमत आहे. याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 10.99 लाख ते 12.79 लाख रुपयांदरम्यान आहे. तर CNG मॉडेलची किंमत 10.44 लाख ते 11.54 लाख रुपयांदरम्यान आहे. नवीन एर्टिगा याच्या जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी आहे, तसेच यात कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत।

New-Gen K-Series Engine नवीन-जेनरेशन के-सिरीज इंजिन

सर्वात मोठे अपडेट नेक्स्ट-जनरेशन 1.5L पेट्रोल इंजिनच्या रूपात या कारमध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन आरामदायी डायव्हिंगसाठी सर्वात उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नवीन ड्युअलजेट गॅसोलीन युनिटमध्ये प्रति दोन इंजेक्टर आहेत. जे इंधन इंजेक्शनवर अधिक नियंत्रण देते. यात स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञान देखील मिळते. जे याची इंधन कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. नवीन पेट्रोल इंजिन 6,000rpm वर 103bhp पॉवर आणि 4,400rpm वर 136.8Nm टॉर्क जनरेट करते.

CNG मोड

नवीन मारुती एर्टिगा 2022 मध्ये 1.5-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किट देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. MPV पेट्रोल मोडवर धावत असताना 136 Nm टॉर्कसह 100 Bhp पॉवर आणि CNG मोडवर धावत असताना 121.5 Nm सह 87 Bhp पॉवर जनरेट करते.

New Automatic Gearbox - स्वयंचलित गिअरबॉक्स

नवीन Ertiga चे सर्व प्रकार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतात. जुन्या 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला नवीन 6-स्पीड ऑटोमॅटिक युनिटने बदलण्यात आले आहे. जे पॅडल शिफ्टर्ससह येते.

कसं आहे मायलेज

जुन्या मॉडेलच्या तुलनेत, नवीन 2022 मारुती एर्टिगा जास्त मायलेज देते. याच्या मॅन्युअल प्रकारात 20.51kmpl, तर ऑटोमॅटिक मॉडेल 20.30kmpl मायलेज देत असल्याचा दावा केला जात आहे. नवीन मारुती एर्टिगा सीएनजी 26.11kmpl मायलेज देते. 

डिझाइन

या नवीन MPV मध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. हे अपडेटेड मॉडेलला 'विंग्ड' क्रोम ट्रिमसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि क्रोम गार्निशसह टेलगेट मिळते. यात दोन नवीन रंग पर्याय देण्यात आले आहे. ज्यात डिग्निटी ब्राउन आणि स्प्लिंडिड सिल्व्हरचा समावेश आहे. 

सुरक्षितता वैशिष्ट्ये

मारुती सुझुकीने नवीन एर्टिगा 4 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) ने सुसज्ज केली आहे. स्टँडर्ड सेफ्टी किटमध्ये मागील पार्किंग सेन्सर्स, EBD आणि ब्रेक असिस्टसह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट सिस्टम, दुसऱ्या रांगेत ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर सीटबेल्ट रिमाइंडर्स सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी