Adas Technology details read in marathi: भारतीय बाजारपेठात नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ADAS System लावण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ADAS System चा वापर करण्यात येत आहे. आयसीई इंजिन असो किंवा इलेक्ट्रिक गाड्या असो... कार निर्माता कंपन्या सेफ्टीसाठी गाड्यांमध्ये ADAS System फीचरचा उपयोग करत आहेत. (What is Adas system in car passenger safety features read details in marathi)
भारतात ADAS सेफ्टी फीचरचा वापर अनेक गाड्यांमध्ये करण्यात येत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, अद्यापही ADAS Technology संदर्भात अनेकांच्या मनात विविध प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा : Pune: वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी पुण्याजवळील प्रसिद्ध ठिकाणे
अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (Advanced Driver Assistance Systems) एक टॉप क्लास मेकॅनिज्म आहे. हे तुम्हाला ऑटोमेटिक कारचं फिलिंग देतं. हे कोणत्याही जर्मन किंवा अमेरिकन गाडीत नाही तर भारतात बनलेल्या महिंद्राच्या गाड्यांमध्ये सुद्धा पहायला मिळतं. अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (Advanced Driver Assistance Systems) खूपच खास सेफ्टी फीचर आहे जे तुम्हाला सरक्षित ठेवण्यासाठी खूप मदत करतं. तुमच्या गाडीच्या समोर असलेल्या गाडीत आणि तुमच्या गाडीत एकसमान अंतर ठेवण्यासाठी या टेक्नोलॉजीचा मोठा फायदा होतो.
हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती कशी झोपते? तुमची रास कोणती?
ADAS आपल्या आसपासच्या परिसरातील सर्व वस्तू पाहण्यासाठी राडार आणि कॅमेऱ्याचा वाहनात उपयोग करतं. त्यानंतर ही सर्व माहिती ड्रायव्हरपर्यंत पोहोचवतं. तसेच यासंदर्भात ऑटोमेटिक अॅक्शन घेण्यात येते. ADAS खासकरून एक चेतावणी देते. याच्या माध्यमातून रिअल-टाइम मल्टिमीडिया, व्हिजन कॉप्रोसेसिंग आणि सेंसर फ्यूजन सबसिस्टमचं समर्थन करण्यासाठी अनेक व्हिजन बेस्ट अल्गोरिदम गाडीत लागू करण्यास मदत मिळते. या सिस्टममुळे रस्ते अपघात टाळण्यास मदत होते.
हे पण वाचा : गरोदरपणात हे पदार्थ चुकूनही खाऊ नका
ADAS सेफ्टी फीचर संदर्भात नागरिकांमध्ये जागरुकता असणे खूपच आवश्यक आहे. जेणेकरुन या सेफ्टी फीचरचा उपयोग प्रत्यक्षात होईल. तसेच नागरिकांनी या फीचरचा गैरवापर करु नये कारण यामुळे मोठा धोका उद्भवू शकतो.