Tyre Colour: वाहनांचे टायर काळे का असतात? इतर कोणत्याही रंगाचे टायर का बनवले जात नाहीत? काही आयडिया...

Black Colour Tyre : आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी आपण लहानपणापासून पाहत असतो. काही गोष्टी ठराविक साच्यातच किंवा एकाच प्रकारच्या असतात. पण आपण रोज त्यांना पाहत असल्यामुळे त्या तशा काय असतील याची कल्पना आपल्या मनात येत नाहीत. वाहनांच्या टायरचेही असेच आहे. गाडी किंवा वाहन (Vehicle Colour) कोणत्याही रंगाचे, आकाराचे असो त्याचे टायर मात्र काळ्या रंगाचेच (Black Tyre) असतात. आता संपूर्ण गाडीचा रंगवेगवेगळा असतो मात्र सर्वांचेच टायर काळ्या रंगाचेच असतात.

Tyre Colour
टायरचा रंग 
थोडं पण कामाचं
  • काही गोष्टी ठराविक साच्यातच किंवा एकाच प्रकारच्या असतात.
  • गाडी किंवा वाहन (Vehicle Colur) कोणत्याही रंगाचे, आकाराचे असो त्याचे टायर मात्र काळ्या रंगाचेच (Black Tyres) असतात.
  • संपूर्ण गाडीचा रंग, डिझाइन, आकार कोणताही असू शकतो मात्र टायरचा नाही कारण पाहा

Why Tyres are Black : नवी दिल्ली : आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी आपण लहानपणापासून पाहत असतो. काही गोष्टी ठराविक साच्यातच किंवा एकाच प्रकारच्या असतात. पण आपण रोज त्यांना पाहत असल्यामुळे त्या तशा काय असतील याची कल्पना आपल्या मनात येत नाहीत. वाहनांच्या टायरचेही असेच आहे. गाडी किंवा वाहन (Vehicle Colour) कोणत्याही रंगाचे, आकाराचे असो त्याचे टायर मात्र काळ्या रंगाचेच (Black Tyres) असतात. आता संपूर्ण गाडीचा रंग, डिझाइन, आकार कोणताही असू शकतो किंवा वेगवेगळ्या मॉडेलचा रंग वेगवेगळा असतो मात्र सर्वांचेच टायर काळ्या रंगाचेच का असतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलांय का. तुम्ही कधी विचार केला आहे का की टायरचा रंग नेहमी काळा का असतो? इतर कोणत्याही रंगाचे टायर का बनवले जात नाहीत? याचे उत्तर जाणून घेऊया. (Why colour of the tyre is always black)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 29 August 2022: डॉलरच्या दबावामुळे सोन्याच्या भावात घसरण, चांदीही उतरली, पाहा ताजा भाव

गाड्यांचे रंग बदलतात टायरचे नाही

जेव्हा तुम्ही कार किंवा बाईक खरेदी करायला जाता तेव्हा त्यात तुमच्याकडे अनेक रंगांचे पर्याय असतात. काहींना पांढऱ्या रंगाची, तर काहींना लाल किंवा चांदीची गाडी. तथापि, जेव्हा टायर खरेदी करण्याचा विचार येतो तेव्हा असा कोणताही पर्याय नाही. टायरचा आकार, कंपनी किंवा शैली भिन्न असू शकते, परंतु रंग नेहमी काळा असतो. 

अधिक वाचा : Jio Offer : जिओ ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन! अमर्यादित कॉलिंग, डेटा.. फक्त 900 रुपयात तेही मध्ये तेही वर्षभरासाठी

एकेकाळी टायर होते पांढरे

फार कमी लोकांना ही माहीती असेल की तब्बल 125 वर्षांपूर्वी टायरचा रंग पांढरा असायचा. याचे कारण टायर बनवण्यासाठी वापरले जाणारे रबर होते, जे दुधाळ पांढरे असते. पण सध्या टायर बनवण्यासाठी इतर साहित्य वापरले जाते. वास्तविक, जुन्या काळातील टायर वाहनाचा भार सांभाळून रस्त्यावरून वेगाने जाण्याइतके मजबूत नव्हते.

काळा टायर आणि पांढरा टायर कोणता जास्त टिकतो

अशा स्थितीत टायरची ताकद आणि आयुर्मान वाढवण्यासाठी मजबूत साहित्याची गरज होती. दुधाळ पांढऱ्या रबरामध्ये कार्बन ब्लॅक जोडल्याने त्याच्या गुणवत्तेत फरक पडला. कार्बन ब्लॅक टायरचे दीर्घायुष्य आणि मजबुती सुधारते. मात्र कार्बन ब्लॅक रबरमध्ये जोडल्याने टायर पूर्णपणे काळा होतो. एका रिपोर्टनुसार, साध्या रबराचा टायर सुमारे 8,000 किमी टिकू शकतो. त्याउलट कार्बनयुक्त रबरचा टायर 1 लाख किमीपर्यंत टिकू शकतो.

अधिक वाचा : The Great Khali : WWE स्टार खलीचा आजही जलवा कायम, आहे गडगंज संपत्तीचा मालक

देशातील ऑटोमोबाइल क्षेत्र झपाट्याने कात टाकते आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे गारठून गेलेले ऑटोमोबाइल क्षेत्र आता पुन्हा तेजीत येताना दिसते आहे. वाहन उत्पादक कंपन्या नवनवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. त्यातच जगभरातील ट्रेंड आणि सरकारचे धोरण यामुळे इलेक्ट्रिक वाहनांवर सर्वांचेच लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक इलेक्ट्रिक कारची मॉडेल बाजारात येत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीचा परिणाम केवळ देशातच नाही तर परदेशातही कार विक्रीच्या आकडेवारीवर दिसून येऊ लागला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी