यामाहा ने लॉन्च केली नवी R15, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Yamaha R15 V3.0: यामाहा कंपनीने आपल्या R15 या बाईकचं नवं व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. या नव्या व्हेरिएंटमध्ये बीएस 6 नॉर्म्स असलेलं इंजिन देण्यात आलं आहे. जाणून घ्या या बाईकची किंमत आणि फिचर्स काय आहेत.

yamaha yzf r15 v3.0 bs 6 launch check price specification technology bike news marathi
यामाहा ने लॉन्च केली नवी R15, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स 

थोडं पण कामाचं

  • यामाहाने लॉन्च केलं Yamaha R15 बाईकचं नवं व्हेरिएंट
  • Yamaha R15 V3.0 बाईकमध्ये बीएस 6 इंजिन
  • या नव्या बाईकची किंमत 1.45 लाखांपासून सुरु

नवी दिल्ली: यामाहा कंपनीने आपली चर्चित बाईक R15 या बाईकचं नवं व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. यामाहा कंपनीकडून यामाहा R15 V3.0 या बाईकचं बीएस 6 नॉर्म्स असलेलं व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. एका महिन्यापूर्वीच कंपनीने एफएस एफआय (FS-FI) आणि एफझेड-एस (FZS-FI) या दोन  बाईक्स लॉन्च केल्या होत्या. आता कंपनीने लॉन्च केलेल्या Yamaha R15 V3.0 या बाईकची सुरुवाती किंमत 1.45 लाखांपासून सुरु होत आहे. ही किंमत Yamaha R15 V3 बाईकच्या बीएस 4 व्हेरिएंटपेक्षा 4,400 रुपयांनी अधिक आहे.

BS 6 Yamaha YZF-R15 Version 3.0 in Thunder Grey

यामाहा R15 V3.0 बीएस 6 बाईकमध्ये कंपनीने 155 cc चा सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 18.6 हॉर्सपावरची ताकद आणि 14.1 एनएमचा टॉर्क जनरेट करतं. तर जुन्या बीएस 4 इंजिनमध्ये 10,000 आरपीएमवर 19.3 हॉर्सपावरची ताकद आणि 8500 आरपीएमवर 14.7 एनएमचा टॉर्क देतं. 

नवी यामाहा आर15 V3.0 (Yamaha R15 V3.0) बाईक तीन रंगांत उपलब्ध आहे. ज्यामध्ये रेसिंग ब्ल्यू, थंडर ग्रे आणि डार्क नाइट या तीन रंगांचा समावेश आहे. रेसिंग ब्ल्यू व्हेरिएंटच्या बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 1,46,900 लाख रुपये, थंडर ग्रे व्हेरिएंट बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 1,45,300 लाख रुपये आणि डार्क नाइट व्हेरिएंट बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 1,47,300 रुपये आहे. कंपनीकडून रेसिंग ब्ल्यू कलर व्हेरिएंटमध्ये ब्ल्यू कलकचे व्हील्स दिले आहेत. 

नव्या बाईकमध्ये साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, ड्युअल हॉर्न आणि पाठीमागे रेडियल ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. बाईक लॉन्चिंग दरम्यान यामाहाचे चेअरमन मोतोफुमी शितारा यांनी सांगितले की, "बीएस 6 इंजिनसह नवी बाईक लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक ग्राहकांना एक खास अनुभव देईल". 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी