मोबाईल हॅकिंग टाळण्यासाठी करायचे दहा सोपे उपाय

10 Simple tips to Avoid Mobile Hacking : निवडक सोपे उपाय करा यामुळे मोबाईल सुरक्षित राहील आणि हॅकिंगचा धोका कमी होण्यास मदत होईल.

10 Simple tips to Avoid Mobile Hacking
मोबाईल हॅकिंग टाळण्यासाठी करायचे दहा सोपे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • मोबाईल हॅकिंग टाळण्यासाठी करायचे दहा सोपे उपाय
 • फक्त स्वतःची USB केबल वापरा
 • मोबाईलचा स्क्रीन लॉक पासवर्ड अथवा पॅटर्न लॉक अधूनमधून बदला आणि तो कोणालाही शेअर करू नका

10 Simple tips to Avoid Mobile Hacking : भारतात कोट्यवधी नागरिकांकडे मोबाईल आहे. स्मार्टफोन धारकांची संख्या वेगाने वाढत आहे. संवाद साधण्यापासून ते इंटरनेटच्या वापरापर्यंत तसेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी मोबाईलचा उपयोग होतो. यामुळे मोबाईल ही वस्तू नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची झाली आहे. मोबाईल नंबर बँक खाते, यूपीआय पेमेंटचे खाते, मोबाईल वॉलेट, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र अशा अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांशी संलग्न आहे. यामुळे प्रत्येकासाठी मोबाईल आणि त्यामधील पर्सनल डेटा सुरक्षित राखणे आवश्यक झाले आहे. मोबाईलचे महत्त्व वाढत असतानाच तो हॅक करून पर्सनल डेटा चोरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याच्या प्रयत्नात वाढ होत आहे. यामुळे मोबाईल हॅकिंगपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने काही उपाय करणे आवश्यक आहे. यातील अनेक उपाय हे सोपे आहेत पण अपुऱ्या माहितीमुळे अथवा बेफिकिरीमुळे ते केले जात नाहीत. हॅकिंग झाल्यावर चूक झाल्याची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेली असते. आपल्याबाबतीत असा प्रकार घडू नये आणि मोबाईल हॅक होऊ नये यासाठी चुका टाळा आणि निवडक सोपे उपाय करा. यामुळे मोबाईल सुरक्षित राहील आणि हॅकिंगचा धोका कमी होण्यास मदत होईल. । टेक इट EASY

कोरोना काळातले भन्नाट जुगाड

 1. मोबाईलमधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी केबल वापरत असल्यास फक्त स्वतःची केबल वापरा. इतर कोणाचीही यूएसबी केबल वापरणे टाळा.
 2. ई-मेल अथवा मेसेजच्या माध्यमातून आलेल्या कोणत्याही लिंकविषयी खात्री नसल्यास त्या लिंकवर क्लिक करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.
 3. स्वतःविषयी महत्त्वाची माहिती ऑनलाईन शेअर करणे टाळा.
 4. WhatsApp सारख्या चॅट अॅप्सवर मीडियाचे ऑटो डाउनलोडिंग बाय डीफॉल्ट बंद करा. डाऊनलोड केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाइलमधून आपल्या फोनमधील डेटा डीलीट केला जाऊ शकतो अथवा त्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे खात्री नसल्यास फाइल डाऊनलोड करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेली फाइल डाऊनलोड करणे टाळा. अनावश्यक असलेल्या आणि डुप्लीकेट झालेल्या फाइल डीलीट करा. यामुळे स्टोरेज कपॅसिटीचा व्यवस्थित वापर होईल आणि डेटा सुरक्षित राहील.
 5. अत्यावश्यक असलेली अधिकृत अॅप वापरा. इतर अॅप वापरू नका आणि फोनमध्ये आधीपासून असलेली पण आपण वापरत नसलेली अॅप काढून टाका. काही तरी गिफ्ट मिळत आहे अथवा फ्री मिळत आहे म्हणून अज्ञात अॅप डाऊनलोड करणे टाळा. एखादे अॅप वापरून बघायचे असेल तर आधी जुन्या फोनवर डाऊनलोड करून बघा. नंतर वापरातील फोनवर डाऊनलोड करावे की नाही याचा विचार करा.
 6. मोबाईलमधील ऑपरेटिंग सिस्टिम अर्थात OS आणि वापरातील अॅप अप टू डेट ठेवा. अधिकृत मार्गानेच OS आणि वापरातील अॅप अपडेट करा. हार्डवेअर, अॅप आणि OS आवश्यकतेनुसार अधिकृत मार्गाने अपडेट करा.
 7. मोबाईलचा स्क्रीन लॉक पासवर्ड अथवा पॅटर्न लॉक अधूनमधून बदला आणि तो कोणालाही शेअर करू नका.
 8. किमान दर तीन महिन्यांनी तुमचा वायफाय पासवर्ड बदला. पासवर्ड सोपे ठेवू नका त्यात आकडे, स्पेशल कॅरेक्टर तसेच कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांचे कॉम्बिनेशन ठेवा. यामुळे कोणालाही तुमचा पासवर्ड शोधून हॅकिंग करणे जमणार नाही. 
 9. वायफायचे सॉफ्टवेअर अर्थात फर्मवेअर अपडेट ठेवा.
 10. पासवर्ड, पिन नंबर, ओटीपी अशी माहिती स्वतःपुरती मर्यादीत ठेवा ती कोणालाही सांगू नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी