Mother's Day Smartphones Gift: 5 स्मार्टफोन जे आपण आपल्या आईला मातृदिनी भेद देऊ शकता

गॅजेट फिव्हर
Updated May 08, 2021 | 10:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

यंदाच्या मातृदिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आईला खास भेट देऊ शकता. या 5 स्मार्टफोन्सपैकी एखादा फोन देऊन आपण हा दिवस खास बनवू शकता. जाणून घ्या हे पाच फोन्स, त्यांच्यातील फीचर्स, किंमती आणि इतर तपशील.

Mother and daughter
5 स्मार्टफोन जे आपण आपल्या आईला मातृदिनासाठी देऊ शकता 
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा मातृदिन आहे वेगळा
  • ऑनलाईन ऑर्डर करून आपल्या आईला भेट द्या स्मार्टफोन
  • ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलद्वारे राहा सतत आईच्या संपर्कात

नवी दिल्लीः यावर्षी 9 मे रोजी मातृदिन (Mother’s Day) साजरा केला जाणार आहे. मात्र इतर वर्षांपेक्षा यावर्षीचा मातृदिन वेगळा (different) असणार आहे. कोरोनाच्या संकटाचे सावट (corona pandemic) अद्याप देशावर आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये (states) लॉकडाऊनसह (lockdown) अनेक निर्बंध (restrictions) लागू आहेत. तरीही आपण आपल्या आईसाठी (mother) हा दिवस खास (special) बनवू शकता. तिला भेट (gift) देऊ शकता. यासाठी आपण ऑनलाईन खरेदी (online shopping) करू शकता. आपल्या आईला स्मार्टफोन (smartphone) हे उत्तम गिफ्ट ठरू शकते जेणेकरून आपण तिच्याशी ऑडिओ (audio) किंवा व्हिडिओ कॉलच्या (video call) माध्यमातून कधीही संपर्क (contact) साधू शकता. जाणून घ्या कोणते आहेत मातृदिनासाठी आईला भेट देण्यासाठी सर्वात चांगले स्मार्टफोन.

Mother's Day 2021 Wishes and Messages: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, Wishes, Images शेअर करा

Mother’s Day 2021 Quotes and Messages: आईचे महत्त्व सांगणारे सुंदर विचारांनी आईला द्या मदर्स डेच्या शुभेच्छा

पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांसाठी महत्त्वाच्या आहेत 'या' गोष्टी, यामुळे आयुष्य होईल सोपं

रियलमी सी25

रियलमी सी25मध्ये 6.5-इंचांचा डिस्प्ले, 64GB/128GB स्टोरेजसोबत Helio G70, 4GB रॅम, मायक्रो एसडीसोबत 256GBपर्यंतची एक्सपांडेबल मेमरी आहे. हा फोन अँड्रॉईड 11वर चालतो. यात 13MPचा रियर कॅमेरा आणि 2MP+2MP+8MPचा फ्रंट-फेसिंग कॅमरा आहे. यात 6000mAhची बॅटरी आहे. याची किंमत 6,999 रुपयांपासून पुढे आहे.

रियलमी नारजो 30ए

रियलमी नारजो 30एमध्ये 6.5-इंचांचा डिस्प्ले, Helio G85, 13MP+2MPचा रियर कॅमरा आणि 8MPचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 6000mAhची बॅटरी आहे. भारतात याची किंमत 8,999 रुपयांपासून सुरू होते.

शिओमी रेडमी 9 पावर

या फोनमध्ये M12 6.53 इंचांचा FHD+डिस्प्ले, 48MP क्वाड रियर कॅमेरा + 8MPचा फ्रंट कॅमेरा, 6000mAhची बॅटरी आहे. याची किंमत 10,999 रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम12

सॅमसंग गॅलेक्सी M12मध्ये 6.5-इंच HD+ इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे जो 2GHz ऑक्टा-कोर Exynos 850 प्रोसेसरद्वारे संचालित आहे. 6GB RAM, अँड्रॉईड 11 यात आहे. तसेच 48MP+5MP+2MP+2MP कॅमेरा आणि 8MPचा फ्रंट कॅमेरा यात आहे आणि 6,000mAhची बॅटरी आहे. भारतात याची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू होते.

सॅमसंग गॅलेक्सी एफ12

सॅमसंग गॅलेक्सी F12मध्ये 6.5 इंचांचा 90Hz डिस्प्ले, 48MPचा कॅमरा आणि 6000mAhची बॅटरी आहे. हा फोन भारतात 9999 रुपयात उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी