१ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत ७ उत्तम फोन, कॅमेऱ्यासह बरंच काही

गॅजेट फिव्हर
Updated Jan 18, 2021 | 15:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्याला जर स्वस्त दरांत चांगला फोन विकत घ्यायचा असेल तर आम्ही आपल्याला काही चांगले पर्याय सांगणार आहोत. यांची किंमत 1000 रुपयांपेक्षाही कमी आहे आणि यात मेमरी कार्ड आणि कॅमेराही उत्तम आहे.

Cost-friendly feature phones
1 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत 7 उत्तम फोन, कॅमेऱ्यासह आहे बरेच काही  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • स्मार्टफोन न परवडणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय असलेले फीचर फोन
  • स्वस्त दरासोबतच चांगली बॅटरी, कॅमेरा यांच्यासह इतर फीचर्स
  • अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर काय आहेत यांच्या किंमती?

मुंबई: देशात सध्या स्मार्टफोनचा (Smartphone) बोलबाला आहे. बहुतेक लोक या स्मार्टफोनचा वापर करतात. पण यावेळी आपल्याला हेही विसरून चालणार नाही की आपल्या देशातील 30-35 टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेच्या (poverty line) खाली जगणारी आहे. याचाच अर्थ त्यांची आर्थिक परिस्थिती (financial condition) खूप हालाखीची (poor) आहे. त्यामुळे ते स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम नाहीत. त्यांना साध्या फीचर फोनवर (feature phone) समाधान मानावे लागते. या वर्गाच्या समस्या लक्षात घेता मोबाईल कंपन्यांनी (mobile companies) स्वस्त दरात (affordable rates) फोन उपलब्ध करून दिले आहेत. यात कॅमेरा (camera), स्टोरेज (storage), ऑडियो (audio) आणि व्हिडिओ प्लेअरसह (video player) अनेक फीचर्स (features) आहेत. हा फोन 4जीवर (4G) चालतो. जाणून घ्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 7 फोनबद्दल.

Itel it2173 Itel it2163

Itel it2173 हा फीचर फोन अॅमेझॉनवर 919 रुपयांत मिळतो आहे आणि फ्लिपकार्टवर 999 रुपयांत उपलब्ध आहे. यात 1.8 इंचांचा स्क्रीन देण्यात आला आहे. हा फोन 8 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. फोनमध्ये 1000mAhची बॅटरी आहे. यात 32 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे. यात 0.3 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. तर Itel it2163 अॅमेझॉनवर 850 आणि फ्लिपकार्टवर 799 रुपयात मिळत आहे. यात 1.8 इंचांचा डिस्प्ले, ड्यूएल सिम, 1000 mAh बॅटरी, 2जी, 3जी आणि 4जी नेटवर्कची सुविधा देण्यात आली आहे.

Lava A1 आणि Lava A1 Josh

लावाचा Lava A1 फीचर फोन 897 रुपयांत मिळतो आहे. यात 1.77 इंचाचा डिस्प्ले आहे. स्टोरेज हे एसडी कार्डद्वारे 32 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. 0.3 एमपीचा कॅमेरा आहे. यात 800 mAhची बॅटरी आहे आणि रेडिओ आणि म्यूझिक प्लेअरही आहे. तर Lava A1 Josh आपल्याला 865 रुपयांत मिळेल. यात ड्युएल सिम आहे, तो 4जीवर चालतो. मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात रेडिओ, व्हिडिओ प्लेअर, म्यूझिक प्लेअरही आहे.

Micromax X424 Plus mAh

Micromax X424 Plus फीचर फोनची किंमत 900 रुपये आहे. यात 0.3 एमपीचा रियर आणि फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी 1750 mAhची आहे. डिस्प्ले 1.8 इंचांचा आहे. याची मेमरी 8 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते. यात रेडिओ, लाऊडस्पीकर, व्हिडिओ प्लेअर आहे.

Karbonn KX3 mAh

कार्बनचा Karbonn KX3 फीचर फोन अॅमेझॉनवर 789 तर फ्लिपकार्टवर 819 रुपयांत मिळतो आहे. यात इंटर्नल मेमरीसोबतच एसडी कार्डद्वारे 32 जीबी वाढवण्याची सोय आहे. यात 1.77 इंचांचा डिस्प्ले आहे. कार्बनच्या या फोनमध्ये 800 mAhची बॅटरी आणि 0.3 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. सोबतच रेडिओ, व्हिडिओ प्लेअर, म्यूझिक प्लेअरही आहे.

I Kall K18 2020 mAh

फीचर फोन I Kall K18 2020ची किंमत पेटीएम मॉलवर 976 रुपये, अॅमेझॉनवर 1899 रुपये तर फ्लिपकार्टवर 1109 रुपये आहे. या फोनचा डिस्प्ले 2.4 इंच आहे. बॅटरी 2500 mAh आहे. रियर कॅमेरा 0.3 एमपीचा आहे. मेमरी ही 8 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते. यात फ्लॅशचीही सुविधा देण्यात आलेली आहे. यात आपण व्हिडिओ किंवा म्यूझिकही चालवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी