Aarogya Setu App: जाणून घ्या कोणी बनवले आरोग्य सेतू अॅप, आयटी मंत्रालयाने मान्य केली चूक

गॅजेट फिव्हर
Updated Oct 29, 2020 | 16:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

आरोग्य सेतू अॅपवरून उफाळलेल्या वादानंतर सरकारचे स्पष्टीकरण समोर आले आहे. सरकारने म्हटले आहे की राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्राने उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील स्वयंसेवकांच्या मदतीने हे अॅप तयार करण्यात आले.

Arogya Setu app
Aarogya Setu App: जाणून घ्या कोणी बनवले आरोग्य सेतू अॅप, आयटी मंत्रालयाने मान्य केली चूक 

थोडं पण कामाचं

  • सीआयसीची नोटीस
  • मंत्रालयाचे स्पष्टीकरण
  • २४ नोव्हेंबर रोजी हजेरी

नवी दिल्ली: कोव्हिड-19चा (Covid-19) प्रसार थांबवण्यासाठी (topping the spread) सरकारद्वारे (government) ज्या आरोग्य सेतू अॅपच्या (Aarogya Setu app) वापरास प्रोत्साहन (encouragement) दिले जात होते त्याबाबत चालू असलेल्या वादातच संचार प्रौद्योगिकी मंत्रालयाने (Communication Ministry) आपली चूक मान्य केली (accepts mistake) आहे. मंत्रालयाने मान्य केले आहे की याबाबत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या (mistakes of officers) काही चुका झाल्या आहेत. आरोग्य सेतू टीमची (Aarogya Setu team) स्थापना या महिन्याच्या एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. सरकारने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्राने (Information-Science Department) उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील स्वयंसेवकांच्या (volunteers) मदतीने हे अॅप तयार करण्यात आले आहे.

सीआयसीची नोटिस

याआधी अशा बातम्या येत होत्या की, केंद्रीय माहिती आयोगाला हे अॅप कोणी तयार केले आहे हे स्पष्ट करण्यात अपयश आले आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, एनआयसी आणि राष्ट्रीय ई-अधिशासन प्रभागाचे मुख्य माहिती अधिकारी या सर्वांना कारणे दाखवा नोटिस जारी करण्यात आली होती. यानंतर मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

मंत्रालयाचे स्पष्टीकरण

मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे, ‘आरोग्य सेतू अॅपचा विकास एऩआयसीने उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील स्वयंसेवकांच्या मदतीने केला आहे. हे अॅप अतिशय पारदर्शक पद्धतीने करण्यात आला आहे.’ याआधी केंद्रीय माहिती आयोगाने एनआयसीला हे स्पष्ट करण्यास सांगण्यात आले होते की त्यांच्याकडे याबाबतची माहिती का नाही की हा अॅप कुणी विकसित केला आहे, जेव्हा संकेतस्थळावर असे सांगण्यात आले आहे की या अॅपचा विकास, डिझाईन एनआयसीने केले आहे.

२४ नोव्हेंबर रोजी हजेरी

सीआयसीच्या आदेशानुसार एमआयटी, एनईजीडी आणि एनआयसीच्या सीपीआयओना २४ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांच्यासमोर हजर राहावे लागेल. एमआयटीने म्हटले आहे की, ते या आदेशाचे पालन करण्यासाठी उचित पावले उचलत आहे. तसेच त्यांनी असेही सांगितले आहे की, आरोग्य सेतू अॅप आणि देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यातली त्याची भूमिका यावर कोणतीही शंका घेऊ नये.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी