Airtel Offer: अवघ्या 399 मिळवा 999 रुपयांचा प्लान

गॅजेट फिव्हर
Updated May 08, 2019 | 15:38 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Airtel: एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, एअरटेल 4G हॉटस्पॉट जो आतापर्यंत 999 रुपयांत मिळत होता तो तुम्हाला आता 399 रुपयांत मिळणार आहे. जाणून घ्या कसा आहे संपूर्ण प्लान आणि किती मिळणार डेटा.

airtel offer rs 399 postpaid plan
अवघ्या 399 मिळवा 999 रुपयांचा प्लान  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: एअरटेल कंपनीने नुकतचं आपल्या पोस्टपेड प्लानमध्ये काही बदल केले आहेत. टेलिकॉम कंपनीने आपल्या पोस्टपेड प्लानमध्ये पूर्ण बदल केले आहेत आणि आता विविध किमतीत प्लान्स लॉन्च केले आहेत. एअरटेल कंपंनीने केवळ पोस्टपेड प्लानमध्ये बदल केलेले नाहीयेत तर त्यासोबतच नवी ऑफरही सादर करत आहे आणि ती सुद्धा प्रीपेड प्लानसोबत. इतकचं नाही तर एअरटेल 4G हॉटस्पॉट डिव्हाइसवर सुद्धा नव्या ऑफर देण्यात येत आहेत.

4G हॉटस्पॉट टेलिकॉम कंपन्यांसाठी एक चांगली योजना आहे. आपण पाहिलतर तर लक्षात येईल की, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी एकसारखेच प्रोडक्ट्स बाजारात लॉन्च केले आहेत. तसेच या दोन्ही कंपन्यांनी प्रोडक्ट्सच्या किंमती सुद्धा जवळपास सारख्याच ठेवल्या आहेत. रिलायन्स जिओफाय आणि एअरटेल 4G हॉटस्पॉट दोन्ही 999 रुपयांत उपलब्ध आहेत. मात्र, आता तुम्ही एअरटेलचा 4G हॉटस्पॉट केवळ 399 रुपयांत खरेदी करु शकणार आहात. 

एअरटेलच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या रजिस्टर ऑफरनुसार, एअरटेल 4G हॉटस्पॉटच्या या प्लानमध्ये 50GB डेटा प्रति महिना मिळणार आहे. तसेच इंटरनेट डेटाची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना 80kbps च्या स्पीडने डेटा मिळणार आहे. ग्राहक हा प्लान एअरटेलच्या वेबसाइटवरुन खरेदी करु शकतात.

एअरटेल 4G हॉटस्पॉटच्या मदतीने 10 डिव्हाइस एकत्र जोडले जातात. भारती एअरटेलने हुवावेसोबत पार्टनरशिप केली आहे. ज्या अंतर्गत कंपनी एअरटेलसाठी डिव्हाइस बनवणार आहे. या डिव्हाइसमध्ये 1500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे ज्याच्या सहाय्याने हे डिव्हाइस 6 तास वापरता येऊ शकतं. जिओफायच्या तुलनेत एअरटेल 4G शी कमी डिव्हाइस कनेक्ट होतात. रिलायन्स जिओफायच्या माध्यमातून 31 डिव्हाइस कनेक्ट करता येतात.

जिओ इफेक्ट:

रिलायन्स जिओने आपले स्वस्त आणि मस्त प्लान्स बाजारात लॉन्च केल्यानंतर त्याचा फटका इतर टेलिकॉम कंपन्यांना बसला. रिलायन्स जिओच्या स्वस्त प्लान्सकडे सर्वच ग्राहक आकर्षित झाले. परिणामी इतर टेलिकॉम कंपन्यांना सुद्धा आपल्या कॉल्सच्या दरात कपात आणि इंटरनेट डेटा स्वस्त करावा लागला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Airtel Offer: अवघ्या 399 मिळवा 999 रुपयांचा प्लान Description: Airtel: एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, एअरटेल 4G हॉटस्पॉट जो आतापर्यंत 999 रुपयांत मिळत होता तो तुम्हाला आता 399 रुपयांत मिळणार आहे. जाणून घ्या कसा आहे संपूर्ण प्लान आणि किती मिळणार डेटा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola