Airtel Prepaid Recharge: एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळणार तब्बल ४ लाखांचा विमा

गॅजेट फिव्हर
Updated May 10, 2019 | 16:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Airtel Recharge:  एअरटेलने १२९ आणि २४९ रुपयांचे दोन नवे प्रीपेड प्लॅन हे बाजारात आणले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक नवीन सेवा देण्यात आल्या आहेत.

airtel_twitter
एअरटेलच्या १२९ आणि २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मोठे बदल  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. पण या पेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे एअरटेलने नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना पोस्टपेड प्लॅनमधील सुविधा देण्यात येणार आहेत. एअरटेलचे हे नवे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना खूपच आकर्षित करणारे आहेत. पण एअरटेलच्या समोर एक मोठी अडचण ही आहे की, ग्राहकांना कंपनीच्या नव्या पोर्टफोलियोबाबत फार काही माहिती नाही. 

एअरटेलच्या या नव्या पोर्टफोलियोमध्ये १२९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणि २४९ रुपयांचा प्लॅन आहे. १२९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा विचार केल्यास हा प्लॅन विशिष्ठ ग्राहक वर्गाला लक्षात ठेऊन तयार करण्यात आला आहे. ज्यांना स्वस्त प्रीपेड प्लॅन हवा आहे त्यांच्यासाठी हे एअरटेल हा प्लॅन घेऊन आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला २ जीबी डेटा २८ दिवसांसाठी वापरता येणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस ही सुविधा मिळणार आहे. 

याशिवाय या प्लॅनमध्ये एअरटेल टीव्ही आणि विंक म्युझिकचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल टीव्हीवर आपण ३५० लाइट टीव्ही चॅनल आणि १० हजाराहून अधिक सिनेमा आणि शो पाहू शकतात. तर २४९ रुपयांच्या प्लॅनचा जर आपण विचार केल्यास या प्लॅनमध्ये ज्या सुविधा मिळणार आहेत त्या कोणत्याही प्लॅनमध्ये देण्यात आलेल्या नाही. टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ४ लाख रुपयांच्या एचडीएफसी लाइफ इंश्युरंस मिळणार आहे. 

या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळणार आहे. २४९ रुपयांचा हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असणार आहे. याच्या अतिरिक्त प्लॅनमध्ये एअरटेल टीव्ही, विंक म्युझिक याचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. नवा ४जी फोन खरेदी केल्यास या प्लॅन अंतर्गत २००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तसंच नॉरटोन मोबाइल सिक्युरिटीचं एक वर्षाचं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. 

दूरसंचार कंपनी जिओ बाजारात आल्यापासून एअरटेलला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले आहेत. त्यामुळे आता एअरटेलच्या या नव्या प्लॅन्सला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओ यासारखेच इतरही काही नवे प्लॅन बाजारात आणणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Airtel Prepaid Recharge: एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळणार तब्बल ४ लाखांचा विमा Description: Airtel Recharge:  एअरटेलने १२९ आणि २४९ रुपयांचे दोन नवे प्रीपेड प्लॅन हे बाजारात आणले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक नवीन सेवा देण्यात आल्या आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola