वायफाय: एअरटेलच्या एका हायस्पीड राउटरवर साठ कनेक्शन

एअरटेलने एक्सस्ट्रीम फायबरने जोडलेले अत्याधुनिक हायस्पीड वायफाय राउटर लाँच केले

Airtel Xstream Fiber Connect Up to 60 devices at superfast speed
वायफाय: एअरटेलच्या एका हायस्पीड राउटरवर साठ कनेक्शन 
थोडं पण कामाचं
  • वायफाय: एअरटेलच्या एका हायस्पीड राउटरवर साठ कनेक्शन
  • एक जीबीपीएस वेगाचे इंटरनेट कनेक्शन
  • विना अडथळा एकाचवेळी साठ उपकरणांना हायस्पीड इंटरनेट कनेक्शन

मुंबईः हायस्पीड फायबर कनेक्शन असूनही एकराचवेळी घरात मोबाइल, लॅपटॉप अशी अनेक उपकरणे एकदम सक्रीय असल्यामुळे इंटरनेट स्पीडची समस्या जाणवते. अनेकांना बफरिंगच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्येवर एअरटेल या भारतीय कंपनीने एक उपाय शोधला आहे. एअरटेलने एक्सस्ट्रीम फायबरने जोडलेले अत्याधुनिक हायस्पीड वायफाय राउटर लाँच केले आहे. Airtel Xstream Fiber Connect Up to 60 devices at superfast speed

कोरोना संकटामुळे इंटरनेटचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. ऑनलाइन शिक्षण, वर्क फ्रॉम होम, कामासाठी अथवा गप्पा मारण्यासाठी होणारे व्हिडीओ कॉल आणि व्हिडीओ कॉन्फरन्स, ऑनलाइन मनोरंजन यामुळे देशातील अनेक घरांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींना दिवसातील जास्तीत जास्त वेळ उत्तम इंटरनेट कनेक्शन हवे असते. हायस्पीड इंटरनेट ही काळाची गरज आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, स्ट्रीमिंग डिव्हाइस, स्पीकर्स, स्मार्ट उपकरणे आणि सुरक्षा प्रणाली यांच्यासाठी हायस्पीड इंटरनेट आवश्यक आहे. ही गरज ओळखून एअरटेलने एक्सस्ट्रीम फायबरने जोडलेले अत्याधुनिक हायस्पीड वायफाय राउटर लाँच केले आहे.

एअरटेलचे हायस्पीड वायफाय राउटर एकाचवेळी (एफटीटीएच कनेक्शनवर) साठ उपकरणांना (डिव्हाइस) हायस्पीड इंटरनेट कनेक्शन पुरवते. या इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. एक जीबीपीएस पर्यंत वेगासह, एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरचे एफटीटीएच नेटवर्क हे सुनिश्चित करते की मोठ्या संख्येने स्मार्ट डिव्हाइस असलेली घरे कधीही वेगवान बँडविड्थच्या बाहेर नसतील. 

एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर ३९९९ रुपयांची मासिक योजना एक जीबीपीएस गतीने अमर्यादित डेटाची ऑफर देते. हा प्रगत 4x4 वाय-फाय मार्ग एक जीबीपीएस वेग सातत्याने अडथळ्याविना प्रत्येक जोडलेल्या उपकरणाला मिळेल याची खबरदारी घेतो. एअरटेलचे हायस्पीड वायफाय राउटर ऑनलाइन गेमिंग आणि अ‍ॅनिमेशन वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम अनुभव अनलॉक करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी