Amazon Great Indian Festival सेल सुरू, iPhoneपासून अनेक गोष्टींवर सूट

Amazon Great Indian Festival: तुम्हाला मोबाइल फोन किंवा इतर वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. कारण Amazon Great Indian Festival ची सुरुवात झाली आहे. 

Amazon Great Indian Festival
(फोटो सौजन्य: Amazon) 

Amazon Great Indian Festival 2020: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची सुरूवात झाली आहे. आता हा सेल प्राइम मेंबर्ससाठी आहे. तर 17 ऑक्टोबरसाठी सर्व ग्राहकांसाठी हा सेल आणि ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. अॅमेझॉनने दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये शेकडो ऑफर्स आणि डील्स उपलब्ध केल्या आहेत. जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर त्यात अनेक बेस्ट ऑफर्स आहेत. या सेलमध्ये अॅमेझॉन आपल्या स्वत:च्या प्रोडक्ट्सवरही चांगली सूट देत आहे. मोबाइल फोन सोबतच टीव्ही आणि लॅपटॉपवरही चांगल्या ऑफर्स उपलब्ध आहेत.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2020 साठी अॅमेझॉनने एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली असून बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्सला 10 टक्के अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. ऑफर अंतर्गत प्रति क्रेडिट कार्डवर जास्तीत जास्त 1,750 रुपये आणि डेबिट कार्डवर 1,250 रुपयांची सवलत मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला एक्सचेंज ऑफर, डिस्काऊंट, नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही निवडून आकर्षक सूट मिळवू शकता.

आयफोन 11 (iPhone 11) 

Apple कंपनीचा iPhone 11 हा अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या सेलमध्ये 47,999 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनची किंमत 64,300 रुपये इतकी आहे. मात्र, सेलमध्ये तुम्हाला हा फोन स्वस्तत मिळत आहे. iPhone 11 ची ही किंमत आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे.

रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro) 

रेडमी नोट 9 प्रो हा स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर प्रथमच त्यावर सूट मिळत आहे. या आठवड्यात ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये हा फोन 12,999 रुपयांत तुम्ही खरेदी करु शकता. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला अतिरिक्त सूट सुद्धा मिळू शकते. रेडमी 9 प्रो हा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720जी चिपसेट आणि 4GB रॅमसह उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलक्सी M51 (Samsung Galaxy M51) 

सॅमसंग कंपनीचा गॅलक्सी M51 हा स्मार्टफोन अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचा एक भाग आहे. 28,999 रुपयांचा हा स्मार्टफोन या सेलमध्ये तुम्ही 22,499 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले 25W फास्ट चार्जिंग, 7000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

ओप्पो A52 (Oppo A52) 

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ओप्पो A52 स्मार्टफोन 15,990 रुपयांत विक्री होत आहे. या फोनची किंमत 20,990 रुपये इतकी आहे मात्र, सेलमध्ये हा फोन स्वस्तात मिळत आहे. यासोबतच तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करु शकता. 

सॅमसंग गॅलक्सी एस20 FE (Samsung Galaxy S20 FE)

सॅमसंग गॅलक्सी एस20 FE हा स्मार्टफोन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये 49,999 रुपयांत उपलब्ध आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर करुन खरेदी केली तर तुम्हाला 4000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. अॅमेझॉन कडून नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात येत आहे. तसेच तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करु शकता.

फायर टीव्ही स्टिक (Fire TV Stick) 

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2020 सेलमध्ये अॅमेझॉनचे सर्व फायर टीव्ही स्टिक मॉडल्स स्वस्त दरात विक्री केले जात आहेत. नुकतेच लॉन्च करण्यात आलेली फायर टीव्ही स्टिक मॉडल 1999 रुपयांत उपलब्ध आहे. नवीन फायर टीव्ही स्टिक मॉडल 2,499 रुपयांत उपलब्ध आहे. 

इको स्मार्ट स्पीकर (Eco Smart Speaker)

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये अॅमेझॉन स्मार्ट स्पीकर्सची इको लाइनअप आकर्षक सूटसह उपलब्ध आहे. तिसऱ्या पिढीच्या ईको डॉटची सेलमध्ये किंमत 1,999 रुपये इतकी आहे. तिसऱ्या पिढीच्या ईकोची किंमत या सेलमध्ये 5,999 रुपयांत तुम्ही खरेदी करु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी