अमेझॉन सेलमध्ये फक्त ५९९ रुपयात खरेदी शकता हे भन्नाट गॅझेट्स

गॅजेट फिव्हर
Updated Jul 16, 2019 | 17:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amazon Prime Day: अमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात आली आहे. त्यातही काही वस्तू अशा आहेत की, ज्या आपण फक्त ५९९ रुपयातच खरेदी करु शकता.

Amazon_prime_day_sale_gadgets_offer
अमेझॉन सेलमध्ये फक्त ५९९ रुपयात खरेदी शकता हे भन्नाट गॅझेट्स 

थोडं पण कामाचं

 • सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर मिळणार मोठी सूट
 • या सेलमध्ये अनेक गॅझेट्स फक्त ५९९ रुपयात खरेदी करु शकता
 • अमेझॉन सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर कॅशबॅक ऑफरही

मुंबई: अमेझॉन प्राईम डे सेल २०१९ चे आता अवघे काही तासच उरले आहेत. या सेलमध्ये वेगवेगळे स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायसेंज यावर आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. हा सेल १५ जुलैला सुरु झाला असून तो १६ जुलैला संपणार आहे. या सेलमध्ये गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह अनेक वस्तूंवर आपल्याला घसघशीत सूट मिळणार आहे. ४८ तासापर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये हेडफोन, ईअरफोन आणि इतर गॅझेट्सवर देखील सूट मिळणार आहे. 

अमेझॉनने या सेलमध्ये विविध प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. विविध कंपन्यांनी या सेलमध्ये आपल्या स्मार्टफोनचे नवे व्हेरिएंट लाँच केले आहेत. अमेझॉन प्राईम डे सेलमध्य एचडीएफसी ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊयात या सेलमध्ये ५९९ रुपयात आपण काय काय खरेदी करु शकता.

या प्रोडक्ट्सवर मिळणार भरघोस सूट 

 1. मोटोरोला ईयरबड्स अॅक्टिव्ह ईयर हेडफोन- १५९९ रुपये किमतीचा हा हेडफोन आपण फक्त ५९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. या हेडफोनवर अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये १००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. 
 2. लॉजिटेक बी 170 वायरलेस माउस देखील आपण या सेल मध्ये खरेदी करु शकतात. हा माउस आपल्याला फक्त ४९९ रुपयात मिळेल. ज्याची किंमत ही ७९५ रुपये एवढी आहे. कंपनीचा असा दावा आहे की, हा माउस १० मीटरपर्यंत वायरसेल रेंजवर काम करतो. या माउसची बॅटरी लाइफ ही १२ महिन्यापर्यंत आहे. 
 3. Mi कॉम्पेक्स एमडेजेड-28 डीआय ब्लूटूथ स्पीकर आपण ५९९ रुपयात खरेदी करु शकतात. याची मूळ किंमत ही ८९९ रुपये एवढी आहे. शाओमीच्या या वायरलेस ब्लूटूथ स्पीकरमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 4.2 चाही सपोर्ट मिळतो. जो आपण ३०० रुपयात खरेदी करु शकतात. 
 4. बोटचा 225 इन ईयर हेडफोन विथ माइक हा या सेलमध्ये फक्त ४९९ रुपयांना आपल्याला खरेदी करता येईल. हा ईयरफोन सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. 
 5. अमेझॉन बेसिक वायर कीबोर्ड या सेलमध्ये ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. याची मूळ किंमत ही १३९५ रुपये एवढी आहे. त्यामुळे या सेलमध्ये यावर ८९६ रुपयांची घसघशीत सूट देण्यात आली आहे. 

 

 1. पॅनासॉनिक ऑन ईयर स्टीरियो हेडफोन हा आपण ५९९ रुपयात खरेदी करु शकता. याची मूळ किंमत ही तब्बल १८९९ रुपये एवढी आहे.  
 2. शाओमी mi ईयरफोन बेसिक विथ माइक आपण या सेलमध्ये फक्त ३९९ रुपयात खरेदी करु शकतात. ५९९ रुपयांच्या या ईयरफोन वर २०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. 
 3. जेबीएल सी 50 एचआय इन ईयर हेडफोन विथ माइक हा ३९९ रुपयांना उपलब्ध आहे. यांची मूळ किंमत ही ९९९ रुपये एवढी आहे. या ईयरफोनला आपण ब्ल्यू, ब्लॅक, व्हाइट आणि रेड कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करु शकता.  
 4. मोटोरोला पल्स 2 ऑन ईयर वायर हेडफोन आपण या सेलमध्ये ५९९ रुपयात खरेदी करु शकता.१,९०० रुपये किंमतीच्या या हेडफोनवर आपल्याला १३०१ रुपये एवढी मोठी सूट मिळणार आहे. 
 5. Frittle स्मार्टवॉच आपण फक्त ५५१ रुपयात खरेदी करु शकतात. याची मूळ किंमत ही १९९९ रुपये एवढी आहे. या वॉचमध्ये स्पीडोमीटर, स्लिपमॉनिटरसह अनेक फीचर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
अमेझॉन सेलमध्ये फक्त ५९९ रुपयात खरेदी शकता हे भन्नाट गॅझेट्स Description: Amazon Prime Day: अमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात आली आहे. त्यातही काही वस्तू अशा आहेत की, ज्या आपण फक्त ५९९ रुपयातच खरेदी करु शकता.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...