iPhone 11 series: अॅप्पलचा मोठा इव्हेंट, पहिल्यांदा Youtube वर लाईव्ह स्ट्रीमिंग

iPhone 11 Series Is All Set To Launch Tonight: आज 10 सप्टेंबर, अॅप्पलचा वार्षिक इव्हेंट मंगळवारी होत आहे. यात बरेच प्रोडक्ट लॉन्च होणार आहेत. 

Apple
iPhone 11 सीरिज आज होणार लॉन्च, Youtube वर लाईव्ह 

थोडं पण कामाचं

  • अॅप्पलचा वार्षिक कार्यक्रम आज कंपनीच्या कूपेरटिनोतल्या हेडक्वॉटरमध्ये होत आहे.
  • भारतीय वेळेनुसार WWDC चा हा कार्यक्रम 10 सप्टेंबरला रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे. 
  • या कार्यक्रमात अॅप्पल आयओएसचं नवीन व्हर्जन, आयपॅडओएस, मॅकओएस, वॉच ओएस आणि टीव्हीओएस लॉन्च करण्याची शक्यता आहे.

अॅप्पलचा वार्षिक कार्यक्रम आज कंपनीच्या कूपेरटिनोतल्या हेडक्वॉटरमध्ये होत आहे. भारतीय वेळेनुसार WWDC चा हा कार्यक्रम 10 सप्टेंबरला रात्री 10:30 वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमात अॅप्पल आयओएसचं नवीन व्हर्जन, आयपॅडओएस, मॅकओएस, वॉच ओएस आणि टीव्हीओएस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त कंपनी भविष्यात येणारी अॅप्पल आर्केड गेमिंग सर्व्हिसशी संबंधित काही गोष्टींची घोषणा करू शकते.

अॅप्पल कंपनी या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्युब चॅनेलवर करणार आहे. हा कार्यक्रम तुम्ही यूट्युब चॅनेलवरही बघू शकता. रिपोर्ट्सनुसार, अॅप्पल या कार्यक्रमात आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स लॉन्च करण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये कंपनी कॅमेरा आणखीन चांगल्या दर्जाचा करण्याची शक्यता आहे. आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्समध्ये स्क्वेअर शेपचे कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

आयफोन 11 मध्ये 2 कॅमेरा सेंन्सर असू शकतात. अॅप्पल पहिल्यांदा हा वार्षिक कार्यक्रम पहिल्यांदा यूट्युबवर लाईव्ह स्ट्रीम करेल. गेल्या वर्षी कंपनीनं ट्विटरवर आपला वार्षिक कार्यक्रम स्ट्रीम केला होता. अॅप्पलच्या या वार्षिक कार्यक्रमाची सर्वांना उत्सुकता लागलेली असते. दरवर्षी अॅप्पल या खास कार्यक्रमात नवीन प्रोडक्ट लॉन्च करतं. या व्यतिरिक्त अॅप्पलचं ऑपरेटिंग सिस्टममधल्या बदलांची देखील माहिती या कार्यक्रमात दिली जाते. अॅप्पलनं आपले आयफोन, आयपॅड सारखे बरेच प्रोडक्ट या कार्यक्रमात लॉन्च केलेत. WWDC नावाच्या या कार्यक्रमात अॅप्पल भविष्यात लॉन्च होणाऱ्या प्रोडक्टची झलक देखील दाखवतात. 

नवीन आयफोन 11 सीरिज

iPhone 11 प्रो आणि iPhone 11 Pro Max या आयफोनची किंमत जवळपास 999 डॉलर आणि 1099 डॉलर असण्याची शक्यता आहे. iPhone 11, iPhone 11 Pro, आणि iPhone 11 Pro Max हे तिन्ही आयफोन तीन स्टोरेजच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील.

iPhone 11, 11 Pro, 11 Pro Max prices leaked, starts at $749

 iPhone 11 हा आयफोन 64GB, 128GB, आणि 256GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये हे आयफोन ग्राहकांसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. तर iPhone 11 Pro आणि  iPhone 11 Pro Max हा  128GB, 256GB, आणि 512GB या व्हेरिएंटमध्ये विक्रीस उपलब्ध असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...