स्वत झाले  iPhone 11, iPhone XR, iPhone SE (2020), किंमतीमध्ये मोठी कपात, पाहा नवे दर 

iPhone Price slash: Appleच्या आयफोन एक्सआर, आयफोन एसई (2020), आयफोन 11 च्या किंमती भारतात मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.

iPhone_11_iPhone_XR_iPhone_SE
स्वत झाले अॅपलचे 'हे' फोन, पाहा काय आहेत किंमती   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: अॅपलने आपला iPhone 12 लाँच केल्यानंतर भारतात iPhone XR, iPhone SE (2020), iPhone 11, किंमतीत मोठी घसरण झाली आहे. ऑनलाइन स्टोअरमध्ये  MRP आता दिसून येत आहे. मात्र, Amazon आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन विक्रेत्यांनी आपल्या किंमतीत अद्याप बदल केलेला नाही.  किंमतीत कपात केल्यामुळे Appleने iPhone XR, iPhone SE (2020) आणि iPhone 11 च्या रिटेल बॉक्समधून चार्जर आणि इअरपॉड्स हटवले आहेत. आयफोन 12 सीरीजमधील स्मार्टफोनमध्ये देखील चार्जर आणि इअरपॉड्स नाहीत. दरम्यान, दिवाळीच्या ऑफरमध्ये Apple आयफोन 11 सोबत  एअरपॉड्स मोफत देत आहे.

भारतात iPhone XR, iPhone SE (2020), iPhone 11 च्या किंमती: 

Apple इंडिया ऑनलाइन स्टोअरवरील उत्पादनांच्या यादीनुसार भारतात iPhone XRची किंमत 52,500 रुपयांवरून 47,900 रुपये झाली आहे. IPhone SE (2020) 64GB व्हेरिएंटची किंमतही 42,500 रुपयांनी कमी करून 39,900 रुपये करण्यात आली आहे. IPhone SE (2020) के 128GB आणि 256GB व्हर्जनच्या सुद्धा किंमतीत कपात केली गेली असून ती अनुक्रमे, 44,900 आणि, 54,900 रुपये आहे. त्याचप्रमाणे भारतात iPhone 11 ची किंमत 68,300 रुपयांवरून 54,900 रुपये करण्यात आली आहे.

तथापि, Apple इंडिया ऑनलाइन स्टोअरने आयफोन एक्सआर, आयफोन एसई (2020) आणि आयफोन 11 ची नवीन किंमतींसह विक्री सुरू केली आहे. Amazon आणि फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स साइटवर अद्याप सुधारित किंमती बदल्या गेल्या नाहीत. Apple दिवाळीच्या ऑफरमध्ये 17 ऑक्टोबरपासून आयफोन 11 सह एअरपॉड्स देत आहे. ज्याची किंमत 14900 रुपये आहे.

आयफोन आता यूएसबी-सी लाइटनिंग केबलसह आला आहे. केबल चार्ज करण्यासाठी पॉवर अ‍ॅडॉप्टर वापरता येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी