Iphone 12 price in India: iPhone 12 लाँच, पाहा याच्या किंमती आणि फिचर्स 

iPhone 12: Apple ने आपल्या आयफोन 12 सीरीजचे नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. जाणून घ्या या नव्या फोनचे फीचर्स आणि किंमत.

Apple_12_launch
अॅपल १२ लाँच  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अॅपलने आयफोन १२ सीरीज केली लाँच
  • अॅपलने ५ रंगांमध्ये केले नवे फोन लाँच
  • ५ जी सपोर्ट असणारा अॅपलचा पहिलाच फोन

नवी दिल्ली: Apple ने आपला नवा कोरा आयफोन 12 (iPhone 12) लाँच केला आहे. Apple मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टीम कुक (Tim Cook) यांनी स्वत: हा स्मार्टफोन लाँच करत याचे फीचर्स जगासमोर आणले आहेत. टिम कुक यांनी हा व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून हा नवा स्मार्टफोन लाँच केला. यावेळी त्यांनी अॅपलच्या गतकाळातील आठवणींना देखील उजाळा दिला. हा व्हर्च्युअल इव्हेंट ३० लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी पाहिला.

आयफोन १२ पाच रंगांमध्ये उपलब्ध, पाहा काय असणार किंमत

iPhone 12 Pro Max ची किंमत  1,099 डॉलरपासून सुरू होईल तर iPhone 12 Pro ची किंमत 999 डॉलरपासून सुरू होणार आहे. Apple ने आयफोन 12 ला आणखी पाच नवीन रंगांमध्ये लाँच केलं आहे. ज्यामध्ये निळा आणि लाल, काळा, पांढरा आणि हिरवा यांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. अॅपलचा असा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे. आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे जे फोनला पूर्वीपेक्षा टिकाऊ बनवते. आयफोन 12मध्ये चारपट चांगला असल्याचा दावा करण्यात येत आहे. आयफोन 12 A14 बायोनिकद्वारे संचालित आहे.

कॅमेरा

आयफोन 12 मध्ये बारा मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 एमपी वाइड एंगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे. आयफोन 12 चा कॅमेरा हा कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यास सक्षम आहे. असा कंपनीने दावा केला आहे. कंपनीने आपल्या नाईट मोडमध्येही सुधारणा केली आहे. नाईट मोड आता सर्व आयफोन 12 मॉडेल्समध्ये फ्रंट आणि रिअर या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये असणार आहे.

5 जी सपोर्ट 

प्रथमच  5G सपोर्ट असलेला आयफोन बाजारात आला आहे. अॅपलने प्रथमच 5जी आयफोन आणण्यासाठी Verizon शी भागीदारी केली आहे. यावेळी टीम कूकने होम पॉड मिनी स्मार्ट स्पीकर देखील लाँच केले. अॅपलने यासाठी यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षिततेबद्दल बरंच काही सांगितलं आहे. होमपॉड मिनी एक नवीन डिझाइन आणि सातत्याने 360 डिग्री साउंडचा अनुभव प्रदान करण्यात सक्षम आहे. स्मार्ट स्पीकर हा सिरी (Siri) सपोर्टसह आला आहे. यात आपण आयफोनचा वापर करून कॉल, मेसेज आणि मेल देखील करू शकता. हा आपल्यासाठी दोन रंगात उपलब्ध असणार आहे. ज्याची किंमत ९९ डॉलरपासून सुरू होते. ५ नोव्हेंबरपासून याची विक्री सुरु होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी