आता लवकरच वापरा “मेड इन इंडिया I Phone” अमेरिकेत होणार दाखल

गॅजेट फिव्हर
Updated Jun 13, 2019 | 00:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

I Phone Sale : सध्या अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या ट्रेंड वॉरचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच अमेरिकेत मेड इन इंडिया टॅग असलेले भारतीय बनावटीचे आयफोन पाहायला मिळू शकतात.

Made In India iPhone
मेड ईन इंडिया-iPhone  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन याच्या दरम्यान सुरू असलेलं व्यापारी युद्ध  (ट्रेड वॉर) थांबण्याचं नाव घेत नाही आहे. या दोन मोठ्या राष्ट्रांमधील असलेल्या या संघर्षामुळे टेक कंपन्या त्रस्त झाल्या आहेत. अमेरिकेनं चीनची दिग्गज कंपनी हुवावेवर बंदी आणली आहे. तर चीनमध्ये विरोध सहन करत असलेली अमेरिकेची कंपनी अॅपलला सुद्धा नुकसान होत आहेत. यामुळे अमेरिकेच्या अॅपल कंपनीला चीनमध्ये विरोध होत आहे. याव्यतिरिक्त चीननं अॅपलवरील टेरीफ टॅक्समध्येही वाढ केली आहे. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर कोणताही उपाय दिसत नाही आहे. 

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अॅपलच्या एका मोठ्या उत्पादकानं दावा केला आहे की, अॅपलनं आपले सर्व आयफोनची निर्मिती चीनच्या बाहेर करतील. रिपोर्टमध्ये वरिष्ठ फॉक्सकॉन एक्झिक्युटिव्ह यूंग लियू यांनी सांगितलं की, आमचे २५ टक्के प्रोडक्शन क्षमता चीनच्या बाहेर आहे आणि आम्ही अमेरिकेत अॅपलच्या मागणी नुसार त्यांची मदत करू शकतो.      

तसेच ते म्हणाले, “अॅपलची मागणी पूर्ण करण्यासाठी फॉक्सकॉन सक्षम आहे.” एप्रिलमध्ये एक रिपोर्ट समोर आला होता, फॉक्सकॉन कंपनी आयफोनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर भारतात करण्याच्या प्रयत्नात असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. पण हा निर्णय आयात शुल्क कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे की चीनबाहेर उत्पादन वाढवण्याची तयारी करण्यात येत आहे यावर अजून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेलं नाही.

चीनच्या बाहेर आयफोनच्या उत्पादनात भारत देश प्रमुख भूमिका घेण्याची शक्यता आहे. चीनद्वारा अॅपल वर लावण्यात आलेल्या २५ टक्के टेरिफ या महिन्याच्या शेवटपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या अॅपल प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ होणार आहे. सध्या चीनमध्ये आयफोन, मॅकबुक, आयपॅड यासारख्या अॅपल प्रोडक्ट्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. टेरिफ लागू झाल्यानंतर अंदाजे अॅपल प्रोडक्ट्सची किंमत सगळीकडे ९ ते १६ टक्के वाढलेली असेल. 

ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार वाढत्या किंमतीमुळे अॅपलची विक्री १० ते ४० टक्के कमी होईल आणि असे झाल्यास पुढील काळात आपल्याला अमेरिका आणि अन्य ठिकाणी भारतीय बनावटीचे आयफोन लवकरच पाहायला मिळतील ज्यावर मेड इन इंडियाचा टॅग असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी