अवघ्या १४,९९० रुपयात लॅपटॉप उपलब्ध, पाहा काय आहेत फीचर्स 

Avita Essential लॅपटॉप हा अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्व फीचर्स आहेत जी एखाद्या महागड्या लॅपटॉपमध्ये असतात.

Avita Essential laptop
Avita Essential लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • Avita Essential लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे
  • या लॅपटॉपमध्ये ६ तास चालू शकेल अशी बॅटरी बसविण्यात आली आहे.
  • लॅपटॉप तीन रंगात उपलब्ध असणार आहे.

मुंबई: लॅपटॉप विकत घेणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. कारण लॅपटॉपच्या किंमती ह्या आजही तुलनेने जास्त आहेत. पण आता बाजारात एक असा लॅपटॉप आला आहे की ज्याची किंमत खूपच कमी आहे. स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक माणूस आता हा लॅपटॉप विकत घेऊ शकतो. Avita Essential यांनी हा लॅपटॉप लाँच केला आहे. हा लॅपटॉप इंटेल सेलेरॉन N4000 प्रोसेसरद्वारे संचालित आहे आणि याची स्लिम-बेझल डिझाइन आहे. Avita Essential मध्ये 14 इंचीचा फुल-एचडी डिस्प्ले आहे आणि याची बॅटरी ६ तासांपर्यंत आहे.

भारतातील Avita Essential लॅपटॉपची किंमत

भारतात Avita Essentialची किंमत केवळ १७,९९० रुपये आहे. तर Amazonवर खरेदीसाठी हा लॅपटॉप उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा लॅपटॉप अ‍ॅमेझॉनवर केवळ १४,९९० रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉन या लॅपटॉपवर नो कॉस्ट ईएमआयसुद्धा देत आहे. आपण दरमहा ७०६ रुपयांच्या ईएमआयवर हा लॅपटॉप खरेदी करू शकता. या लॅपटॉपची दोन वर्षाची वॉरंटी असणार आहे.

Avita Essential लॅपटॉपचे फीचर्स

Avita Essential विंडोज 10 होमवर आधारित आहे स्लिम बेझल डिझाइनसह 14-इंचाचा फुल-एचडी (1920x1080 पिक्सेल) डिस्प्ले आहे. यात 2-मेगापिक्सलचा वेबकॅम आणि ऑप्टिमल डिस्प्लेसाठी  अँटी-ग्लेअर स्क्रीन आहे. लॅपटॉप ड्युअल-कोर इंटेल सेलेरॉन एन 4000 (2.6 GHz क्लॉक) प्रोसेसरसह संचालित आहे. यात 4 जीबी LPDDR4 रॅम सपोर्ट आहे. Avita Essential एक 128 जीबी एसएसडी पॅक करते आणि इंटेल यूएचडी ग्राफिक्स 600 सह येतो. लॅपटॉपमध्ये विना आवाज फॅनलेस डिझाइन आहे.

या लॅपटॉपची बॅटरी सहा तास चालू शकते आहे. दोन 0.8W स्पीकर्स आणि ब्लूटूथ सपोर्टसह येतं. Avita Essentialवर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी 3.0 टाइप-ए स्लॉट, एक मायक्रोएसडी कार्ड रीडर, एक हेडफोन जॅक आणि पॉवर जॅकचा समावेश आहे. लॅपटॉपचे वजन 1.37 किलो आहे.

तीन रंगात लाँच केले

Avita Essential लॅपटॉप हा ग्रे, मॅट ब्लॅक आणि मॅट व्हाइट अशा तीन रंगात उपलब्ध आहे.  अवीता असे नमूद करते की, परवडेल अशा किंमतीवर या उत्पादनासह सुविधा, टिकाऊपणा आणि लवचिकता प्रदान करणे हे त्यांचे ध्येय आहे. Avita Essentialची फॅब्रिकसारखी अनोखी डिझाइन आहे. सध्या अ‍ॅमेझॉनवर हा लॅपटॉप स्वस्त दरात उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी