स्वस्त आणि मस्त लॅपटॉप घ्यायचाय, हे आहेत ६ दमदार फिचर्सचे लॅपटॉप

गॅजेट फिव्हर
Updated Apr 18, 2021 | 22:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

हल्ली तरुणांना चांगल्या लॅपटॉपची आवश्यकता असतेच. मात्र तरुण नेहमी स्वस्त, चांगल्या फिचर्सच्या लॅपटॉपच्या शोधात असतात. अशाच ६ चांगल्या पर्यायाबद्दल माहिती घेऊया. लॅपटॉप वर्क फ्रॉम होम साठीही आवश्यक असतोच.

Best 6 options for laptop, with excellent features
स्वस्त आणि मस्त लॅपटॉपचे ६ दमदार पर्याय 

थोडं पण कामाचं

  • लॅपटॉपच्या चांगल्या ऑफर्स
  • लॅपटॉपचे फिचर्स आणि किंमती
  • बाजारात उपलब्ध मस्त पर्याय

नवी दिल्ली : देशभर कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू झाले आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच इतर ठिकाणीदेखील लॉकडाऊन लागू झाले आहे. अशा अनेक कंपन्या आणि कार्यालये बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच मोठ्या संख्येने नागरिक वर्क फ्रॉम होम या पर्यायाचा वापर करत आहेत. वर्क फ्रॉम होम करण्यासाठी लॅपटॉप ही आवश्यक बाब आहे. शिवाय हल्ली तरुणांना चांगल्या लॅपटॉपची आवश्यकता असतेच. मात्र तरुण नेहमी स्वस्त आणि चांगल्या फिचर्सच्या लॅपटॉपच्या आणि संबंधित ऑफर्सच्या शोधात असतात. अशाच ६ चांगल्या पर्यायाबद्दल माहिती घेऊया.

१. एचपी (Hp) -

एचपीच्या लॅपटॉपची किंमत २९,९९० रुपये आहे. यामध्ये एएमीडी रायझन ३ ३२०० यू (AMD ryzen 3 3200u)प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये १५.६ इंच एचडी प्लस (HD+) डिस्प्ले देण्यात आला आहे. तर ४ जीबी रॅम आणि २५६ जीबीचा स्टोरेज देण्यात आला आहे.

२.  Acer Aspire 3-

या लॅपटॉपची किंमत आहे २९,९०० रुपये. यामध्ये एएमीडी रायझन ३ ३२०० यू (AMD ryzen 3 3200u)प्रोसेसरसोबत ४ जीबी रॅम आणि १ टीबी हार्ड डिस्क मिळते. यामध्ये १५.६ इंच एचडी एलईडी  (HD LED) डिस्प्ले देण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टम यात आहे.

३. HP 15s eq0007AU-

हा लॅपटॉप २९,९९० रुपयांना येतो. यामध्येदेखील एएमीडी रायझन ३ ३२०० यू (AMD ryzen 3 3200u)प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपचा डिस्ल्पे १५.६ इंचाचा असून तो एचडी प्लस (HD+)आहे. शिवाय यात ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी NVMe SSD आणि विंडोज १० होम प्री इन्स्टॉल्ड बंडलसुद्धा आहे.

४. Avita Pura NS14A6INU541 SGGYB-

याची किंमत २९,९९० रुपये आहे. हा लॅपटॉप १४ इंची फुल एचडी प्लस (HD+)डिस्प्लेमध्ये येतो. यात AMD Ryzen 3-3200U प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर AMD Radeon Vega 3 GPU सोबत येतो. या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीची स्टोरेज क्षमता आहे. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्टच्या विंडोज १० होम इन एस मोडवर काम करतो. 

५. Dell Inspiron 14 3481-

या लॅपटॉपची किंमत २५,९९० रुपये आहे. यात १४ इंचाचा डिस्प्ले आणि इंटल कोअर i3 7thजनरेशन प्रोसेसर आहे. यात ४ जीबी रॅम, १ टीबी चा एचडीडी स्टोरेज आणि Ubuntu प्री इंस्टॉल देण्यात आला आहे.

६. Asus ExpertBook P1-

हा लॅपटॉप व्यावसायिकांसाठी आहे. याची किंमत २९,९९० रुपये आहे. यात १४ इंची डिस्प्ले आणि 10th जनरेशन इंटेल कोअर  i3 प्रोसेसर दिलेला आहे. यात ४ जीबी रॅम, १ टीबी एचडीडी आणि लिनक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेली आहे.

याव्यतिरिक्तसुद्धा इतर अनेक पर्याय लॅपटॉपमध्ये आहेत. तुमची गरज आणि बजेट लक्षात घेऊन तुम्ही योग्य त्या पर्यायाची निवड करू शकता. शिवाय विविध कारणांनी अनेक कंपन्या यात ऑफर्सदेखील देत असतात. त्यात किंमतीत आणखी सूट मिळत असते. लॅपटॉप घेताना त्याचा डिस्प्ले, स्टोरेज क्षमता, प्रोसेसर, ऑपरेटिंग सिस्टम इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. शिवाय लॅपटॉप घेताना त्याचा बॅटरी बॅकअपदेखील लक्षात घ्यावा. याव्यतिरिक्त तुम्हाला जर काही अतिरिक्त फिचर्स हवे असतील तर कस्टमाईज स्वरुपातदेखील तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी