जयपूर: जुनी गॅजेट्स (Old gadgets) एका वेळेनंतर किती धोकादायक (dangerous) असू शकतात याचा अंदाज जुने गॅजेट्स वापरणाऱ्यांना बहुदा नसतो. अनेकदा हे जीवघेणेही (life threatening) असू शकते आणि आपल्याला अडचणीत (problem) आणू शकते. राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) असे एक प्रकरण समोर आले आहे जिथे इयरफोनच्या (earphone) मोठ्या आवाजामुळे (loud sound) तरुणाचा जीव गेला (lost life). असे सांगितले जात आहे की हा युवक जुने इयरफोन्स (old earphones) आणि कंप्यूटर (computer) वापरत होता.
ही घटना जयपूरच्या सीकर हायवेच्या उदयपुरिया गावातील आहे जिथे 28 वर्षांच्या एका युवकाचा मृत्यू इयरफोन लावून गाणी ऐकत असताना झाला. तो कंप्यूटरला इयरफोन लावून गाणी ऐकत असताना हा प्रकार झाल्याची माहिती मिळत आहे. अचानक तीव्र आवाज आला आणि इयरफोनचा स्फोट झाला ज्यामुळे युवकाच्या कानातून रक्त येऊ लागले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले, पण डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केले गेले
डॉक्टरांचे म्हणणे आहे की इयरफोनचा स्फोट झाल्यामुळे झालेल्या तीव्र आवाजामुळे युवकाला हृदयाघाताचा झटका आला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या युवकाचा विवाह याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि त्याच्या अभ्यासासाठी तो अनेकदा कंप्यूटरचा वापर करत असे. शुक्रवारी दुपारीही तो आपल्या घरी इयरफोन कंप्यूटरशी जोडून गाणी ऐकत होता ज्यावेळी त्याच्या इयरफोन्सचा स्फोट झाला आणि त्याचा जीव गेला.
हाती आलेल्या माहितीनुसार ही घटना घडली त्यावेळी हा युवक खोलीत एकटाच होता. त्याची आई, बहीण आणि कुटुंबातील इतर सदस्य जवळच्याच शेतात काम करत होते. इयरफोन फाटल्यामुळे झालेल्या तीव्र आवाजामुळे ते सर्वजण लगेच घरी पोहोचले. मात्र त्यांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले नाही आणि त्यामुळे पोलिसांनी केस दाखल केलेली नाही. असे सांगितले जात आहे की हा युवक जे इयरफोन आणि कंप्यूटरचा वापर करत होता ते बरेच जुने होते.