हे आहेत 5 स्वस्त स्मार्टफोन, 10 हजार रूपयांपेक्षा आहे कमी किंमत

Best Smartphone Under 10,000 Rupees:  जर तुम्हाला 10 हजार रूपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. तर आम्ही तुमच्यासाठी भारतात मिळणारे टॉप 5 कमी किंमतीतले स्मार्टफोनची यादी देत आहोत.

Best Smartphone Under 10,000 Rupees
हे आहेत 5 स्वस्त स्मार्टफोन, 10 हजार रूपयांपेक्षा आहे कमी किंमत  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबईः  जर का तुम्ही नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याचा प्लान करत आहात आणि त्यातही 10 हजारांपेक्षा कमी किंमतीतला स्मार्टफोन तुम्हाला हवा असेल तर आज आम्ही तुम्हांला स्वस्त स्मार्टफोनची यादी देणार आहोत. आम्ही तुम्हांला भारतात मिळणारे टॉप 5 कमी किंमतीतले स्मार्टफोनची यादी देत आहोत. ज्याचं बजेट सुद्धा 10 हजार रूपयांच्या आतमध्ये आहे आणि परफॉर्मेन्सपासून कॅमेरा, डिस्प्ले आणि डिझाइन सुद्धा उत्तम आहे. 

या यादीत तुम्हाला मायक्रोमॅक्स,  Xiaomi, इटेंक्स आणि सॅमसंग सारखे मोठ्या कंपनींचे स्वस्त आणि टिकाऊ फोन मिळू शकतात. एक नजर टाकूया 10 हजार किंमतीत येणाऱ्या टॉप मोबाइल फोन्सवर 

1. मोटोरोला मोटो वन मायक्रो 

किंमत -8999 रूपये 

नोव्हेंबर 2019 मध्ये लॉन्च झालेला मोटोरोल मोटो वन मायक्रो स्मार्टफोन स्वस्त स्मार्टफोन आहे. ड्युअल सिम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आहे. त्यासोबतच 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. 4000 mAh बॅटरीसोबत यात 13 + 2 + 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सुद्धा आहे. 

2. रियलमी-5i

किंमत- 9597 

जानेवारी 2020 मध्ये लॉन्च झालेला Realme 5i ड्युअल सिम असलेला स्मार्टफोन आहे. 64 जीबी इंटरनल स्टोरेजसोबत यात 4 जीबी रॅम आहे. 5000 mAh क्षमता असलेल्या बॅटरीसोबत यात 12 + 8 + 2 + 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सुद्धा आहे. 

3. रियलमी-3

किंमत- 8999 

रियलमी-3 ची सुरूवातीची किंमत 8999 रूपये आहे. 4,230 mAh क्षमता असलेल्या बॅटरीसोबत यात MediaTek Helio P70 प्रोसेसरनं पावर्ड आहे. यासोबत या फोनमध्ये बॅक कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 

4. सॅमसंग गॅलेक्सी A10

किंमत- 8490 

2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसोबत सॅमसंग गॅलेक्सी A10 मार्केटमध्ये उपलब्ध आहे. यात 13 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. त्यासोबतच  3,400 mAh क्षमता असलेली बॅटरी आहे. 

5. Redmi Note 8 64GB

किंमत- 10,499 

ऑक्टोबर 2019 मध्ये लॉन्च झालेला शाओमी Redmi Note 8 64GB Smartphone 6.39-इंच IPS सोबत येतो. या ड्युअल सिम असलेल्या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. जो कार्डच्या मदतीनं 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकेल. यात 4000 mAh बॅटरी आणि 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी