Smart phones under Rs. 20000: मनाला भावणारे उत्तम स्मार्टफोन्स 20,000पेक्षाही कमी किंमतीला खरेदी करा

गॅजेट फिव्हर
Updated Jan 20, 2021 | 12:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

आता उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आपल्याला अधिक खर्च करण्याची गरज नाही. आपण 20 हजारापेक्षाही कमी किंमतीत हे स्मार्टफोन खरेदी करून महाग स्मार्टफोनचा आनंद घेऊ शकता.

Cost-friendly smart phones
मनाला भावणारे उत्तम स्मार्टफोन्स 20,000पेक्षाही कमी किंमतीला खरेदी करा 

थोडं पण कामाचं

  • वाढत्या मागणीमुळे मोबाईल कंपन्या आणत आहेत किफायतशीर स्मार्टफोन
  • उत्तम बॅटरी आणि डिस्प्लेसह चांगले कॅमेरा असलेले फोन कमी दरात उपलब्ध
  • जाणून घ्या कोणते आहेत आपल्या खिशाला आणि हौसेला परवडणारे फोन

मुंबई: स्मार्टफोनचे (Smart phones) मॉडेल्स (models) आणि संख्येत (number) सातत्याने वाढ (increase) होत आहे आणि जेव्हा चांगले फीचर्स (good features) असलेला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम (big amount) मोजावी लागण्याचे दिवसही आता मागे पडले आहेत. आता आपण कमी पैशात (lesser costs) उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन बाजारातून (market) किंवा ऑनलाईनही (online) खरेदी करू शकता. शाओमी (Xiaomi), पोको (Poco), सॅमसंग (Samsung), इनफीनिक्स (InPhenix) अशा मोबाईल निर्मात्या कंपन्या (mobile companies) मोठी बॅटरी (batteries), मोठा डिस्प्ले (display), मोठा कॅमेरा (camera) यासह स्मार्टफोन आणत आहेत ज्यांची किंमत 20,000 रुपयांपर्यंतच आहे.

हे आहेत काही उत्तम स्मार्टफोन जे आपल्याला 20,000 रुपयांपर्यंत मिळू शकतात

Realme 6

रियलमीने Realme 6 हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे ज्यात 6.6 इंचांचा डिस्प्ले तर आहेच, सोबतच सेल्फी कॅमेऱ्यासाठी ड्यूएल कॅमेरा पंच होलही आहे. Realme 6 Pro स्नॅपड्रॅगन 720 जी चिपसेटद्वारे चालतो आणि यात 90 Hz रीफ्रेश रेट आहे. यात 64 जीबी स्टोरेजसह 6 जीबी रॅम मिळते. मिड-रेंज मॉडेलमध्ये 6/128 जीबी स्टोरेज आहे तर टॉप-स्पेकमध्ये 8/128 स्टोरेज मिळते. बेस मॉडेलची किंमत 17,999 तर मिड-स्पेक वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे आणि टॉप-स्पेक वेरिएंटची किंमत ही 19,999 रुपये आहे. या फोनमध्ये बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा मिळतो आणि हा 4300 mAhच्या बॅटरीवर चालतो.

Realme 7 Pro

Realme 7 Pro mAhचे फीचर याआधीच्या 6 प्रोवरून अपग्रेड करण्यात आले आहेत. यात AMOLED डिस्प्ले, स्टीरिओ स्पीकर आणि 65 W फास्ट चार्जिंग आहे. Realme 7 Proमध्ये एक समान स्नॅपड्रॅगन 720G चिपसेटची सुविधा आहे आणि यात 4500 mAhची बॅटरी मिळते. याच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये 64 मेगापिक्सेल सोनी IMX682 शूटर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा आहे. याची किंमत 19,999 रुपये आहे.

Redmi Note 9 Pro Max

Redmi Note 9 Pro Max टॉप-एंड मॉडेल आहे चे रेडमी नोट 9 आणि रेडमी नोट 9 प्रोसोबत लाँच करण्यात आले होते. यात 6.67 इंचांचा डिस्प्ले आहे ज्यात पंच-होल डिस्प्ले आहे. रेडमी नोट 6 प्रो मॅक्समध्ये एक स्नॅपड्रॅगन 720G चिपसेट आहे आणि हा फोन तीन वेरिएंट, 6/64 GB, 6/128 GB आणि 8/128 GBमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 15,999 रुपयांपासून चालू होते.

Poco X3

पोको एस्क 2नंतरचे हे पुढचे मॉडेल आहे जो स्नॅपड्रॅगन 732Gची स्नॅपड्रॅगन चिप आहे. X2मध्ये 6000 mAhची बॅटरी आहे आणि यात 6.67 इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. Poco X3च्या फीचरमध्ये ग्लॉसी बॅक पॅनल फिनिशसह बॅक पॅनलवर एक प्रमुख कॅमेरा मॉड्यूल आहे. बेस वेरिएंट 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. मिड स्पेक वेरिएंटमध्ये 128 जीबी स्टोरेज आहे तर टॉप एंड वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम आहे. तिन्ही मॉडेल्सची भारतीय बाजारपेठेतली किंमत 20000पेक्षा कमी आहे. पोको एक्स 3ची किंमत 15,999 रुपये आहे.

Samsung Galaxy M31s

Samsung Galaxy M31s हा Galaxy M31चा उत्तराधिकारी आहे आणि यात 6.5 इंचांचा इनफिनिटी ओ  AMOLED डिस्प्ले आहे जो केंद्रस्थानी असलेल्या पंच होलसह आहे. यात 6000 mAhची मोठी बॅटरी आहे आणि तो बॉक्समध्ये 25W चार्जरसह येतो. यात एका बाजूला माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे जो OneUI 2.1द्वारे संचलित आहे. यात 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी