फोन करावा लागत असेल पुन्हा पुन्हा चार्ज, तर सेटिंग्समध्ये करा हे बदल, वाढेल फोनच्या बॅटरीचे लाईफ

गॅजेट फिव्हर
Updated Jun 10, 2021 | 12:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

अनेकदा सामान्य चुका केल्यामुळे आपल्या फोनचे चार्जिंग वेगाने कमी होऊ शकते आणि पुन्हा पुन्हा तो चार्जिंगला लावावा लागू शकतो. आपण या चुका हमखास करतो. जाणून घ्या काय आहेत या चुका आणि कशा कराल दुरुस्त.

Smartphone
फोन करावा लागत असेल पुन्हा पुन्हा चार्ज, तर सेटिंग्समध्ये करा हे बदल, वाढेल फोनची बॅटरी लाईफ 

थोडं पण कामाचं

  • जाणून घ्या फोनच्या बॅटरीचे लाईफ वाढवण्याचे मार्ग
  • सेटिंग्समध्ये करावे लागतील हे महत्त्वाचे बदल
  • लोकेशन आणि जीपीएस ट्रॅकिंग करावे लागेल बंद

नवी दिल्ली: जेव्हा आपला फोन (Phone) जुना (old) होऊ लागतो तेव्हा अनेक अडचणी (problems) येतात ज्यापैकी एक म्हणजे बॅटरी (battery). फोन जुना झाल्यावर बॅटरी लवकर ड्रेन (battery drain) होते. अनेकदा जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असते तेव्हाच फोन स्विच ऑफ (switch off) होतो. त्यामुळे फोनला पुन्हा पुन्हा चार्जिंगला (charging) लावावे लागते. पण चूक (mistake) नेहमीच जुन्या फोनची नसते. अनेकदा आपल्या चुकांमुळेही (our mistakes) असे होते. जाणून घ्या काय आहेत या चुका आणि कशा या चुका टाळून आपण आपल्या फोनची बॅटरी वाचवू शकता.

जाणून घ्या कशी वाचवाल आपल्या फोनची बॅटरी

यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या फोनमध्ये बॅटरीच्या पर्यायावर जावे लागले. हा पर्याय वेगवेगळ्या स्मार्टफोनसाठी वेगवेगळा असू शकतो. यावर टॅप करून आपल्याला बॅटरी सेव्हर असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा. हा पर्याय ऑन केल्यावर आपली बॅटरी लवकर संपणार नाही. हा पर्याय वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावाने असू शकतो. सॅमसंगमध्ये डिव्हाईस केअरमध्ये हा पर्याय असतो. हा पर्याय निवडल्याने बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले सगळे अॅप्स बंद केले जातात आणि पावर कमी खर्च होते.

लोकेशन आणि GPS ट्रॅकिंग करा बंद

अनेकदा आपल्या फोनचे लोकेशन आणि जीपीएस ट्रॅकिंग सुरू राहते. याची गरज आपल्याला सतत नसते, त्यामुळे जेव्हा गरज नसेल तेव्हा लोकेशन आणि जीपीएस ट्रॅकिंग बंद करा. हे सुरू ठेवल्याने आपल्या फोनची बॅटरी लवकर ड्रेन होते. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच हे फीचर्स सुरू करा.

वॉलपेपरमुळेही होते फोनची बॅटरी खर्च

अनेकदा आपण आपल्या फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर ठेवतो. यामुळे बॅटरी लवकर ड्रेन होते. त्यामुळे स्थिर वॉलपेपर ठेवणे हेच उत्तम. तसेच काळ्या रंगाचा वॉलपेपर ठेवल्यानेही बॅटरी लवकर संपत नाही. याशिवाय अनेक लोकांना आपल्या फोनचा ब्राईटनेस खूप जास्त ठेवण्याची सवय असते. यामुळेही फोनची बॅटरी जास्त खर्च होते. त्यामुळे फोनचा ब्राईटनेस कमी ठेवा, यामुळे बॅटरी वाचेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी