Diwali With Mi Sale: शाओमीचा दिवाळी सेल, या स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काऊंट

Diwali Sale: शाओमीनं दिवाळी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये विविध स्मार्टफोन, टीव्ही आणि अन्य प्रोडक्टवर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे. जाणून घ्या कोणकोणत्या प्रोडक्ट्सवर मिळत आहे डिस्काऊंट. 

Mi Diwali sale
शाओमीचा दिवाळी सेल, या स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काऊंट 

थोडं पण कामाचं

  • शाओमी आपल्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर देत आहेत.
  • शाओमीनं दिवाळी विद मी सेलचं आयोजन करत आहे.
  • ज्यात फोन्सवर ऑकर्षक ऑफर मिळत आहे.

मुंबईः दिवाळीजवळ आली आहे आणि कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर द्यायला देखील सुरू केलं आहे. यामध्ये शाओमी आपल्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर देत आहेत. शाओमीनं दिवाळी विद मी सेलचं आयोजन करत आहे. ज्यात फोन्सवर ऑकर्षक ऑफर मिळत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत असणाऱ्या या सेलमध्ये रेडमी नोट 7 प्रो, पोको एफ1, रेडमी के20 प्रो, रेडमी के 20, रेडमी वाय 3, रेडमी नोट 7 एस आणि रेडमी 7 ए वर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे. 

या व्यतिरिक्त सेलमध्ये शाओमी मी होम सिक्योरिटी कॅमेरा 360 आणि मी एअर फ्यूरिफायर 2एस वर आकर्षक ऑफर मिळत आहे. ग्राहक मी कॉम्पॅक्ट ब्लूटूथ स्पीकर 2, मी पॉकेट स्पीकर 2 आणि मी ईयरफोन्सवरही डिस्काऊंट आहे. 

Diwali with Mi sale मध्ये मिळत आहेत या ऑफर्स 

मी सेल पेजवर काही ऑफर देण्यात आल्यात. ज्यात रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोन 11,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीला मिळत आहे. ही किंमत फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. रेडमी Y 3 स्मार्टफोन सेलमध्ये 7,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीवर मिळेल. 

रेडमी नोट 7 एस स्मार्टफोनवर सुद्धा डिस्काऊंट मिळत आहे. हा फोन तुम्ही 8,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीवर खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. पोको एफ 1 स्मार्टफोन सेलमध्ये 15,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीला खरेदी करू शकता. या प्रकारानं रेडमी के20 प्रो स्मार्टफोन तुम्ही 24,999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता आणि रेडमी के 20 स्मार्टफोन 19,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीला मिळेल. 

शाओमीच्या सेलमध्ये मी आणि अन्य प्रोडक्ट्सवरही ऑफर्स मिळत आहे. जर तुम्हाला टीव्ही खरेदी करायचा आहे तर तुम्ही मी टीव्ही 4A प्रो 43 इंचाचा 20,999 रूपयांच्या किंमतीवर खरेदी करू शकता. मी टीव्ही 4C प्रो 32 इंचाचा तुम्ही केवळ 11,499 रूपयांमध्ये खरेदी करू शकणार आहात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी