Fridge Care: सावधान! करू नका 'या' चुका, नाहीतर घरातच होईल फ्रिजचा बॉम्बसारखा स्फोट!

गॅजेट फिव्हर
Updated Mar 16, 2023 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Fridge Mistakes at Home: तुम्ही फ्रिजची योग्य काळजी घेतली नाही तर तो आपल्यासाठी घातक ठरू शकतो आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या आपण सहसा करतात, ज्यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये मोठा स्फोट होऊ शकतो.

Don't make these mistakes about refrigerator at home
Fridge Care: चुकूनही करू नका 'या' चुका, नाहीतर घरातच होईल फ्रिजचा बॉम्बसारखा स्फोट!   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घाबरू नका फक्त या चुका करणे टाळा
  • लोकल पार्ट्स वापरले तर कंप्रेसरमध्ये स्फोट होऊ शकतो.
  • फ्रिजचा पॉवर बंद करा आणि नंतर चालू करा

Fridge Mistakes: हिवाळा असो उन्हाळा असो  किंवा पावसाळा, प्रत्येक ऋतूत आणि वर्षातील 365 दिवस आणि 24 तास वापरले जाणारे उपकरण म्हणजे घरातील फ्रिज. वर्षातील दोन-चार दिवस सोडले तर जवळपास रोजच फ्रिजचा वापर होतो आणि तो न थांबता वर्षानुवर्षे अखंडपणे काम करत राहतो. रेफ्रिजरेटर हे घरातील एक अतिशय महत्त्वाचे उपकरण आहे, ज्याशिवाय घराचे काम क्वचितच होऊ शकते.

परंतु तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही फ्रिजची योग्य काळजी घेतली नाही तर तो आपल्यासाठी घातक ठरू शकतो आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या आपण सहसा करतात, ज्यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये मोठा स्फोट होऊ शकतो. पण तुम्ही घाबरू नका फक्त या चुका करणे टाळा म्हणजे आपल्याला थंड पदार्थ देणारे फ्रिज कधी गरम होणार नाही.

अधिक वाचा : Holi : रंग खेळताना मोबाईल पाण्यात भिजला तर अशा प्रकारे सुरू करू शकाल

रेफ्रिजरेटर कधीही विजेच्या प्रवाहात चढ-उतार होत असलेल्या म्हणजे फ्लकच्युएट असलेल्या ठिकाणी कनेक्ट करू नका. कारण असे झाल्यास रेफ्रिजरेटरच्या कंप्रेसरवर दबाव वाढू शकतो आणि स्फोट होऊ शकतो.

काहीवेळा रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ सतत गोठत राहते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. अशा वेळी तुम्ही दर काही तासांनी रेफ्रिजरेटर उघडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यामुळे बर्फ गोठण्याची प्रक्रिया मंद होते.

अधिक वाचा: How to reduce data usages: मोबाईल डेटा पटकन संपतो? वापरा या सोप्या टिप्स

रेफ्रिजरेटरमध्ये, विशेषत: कॉम्प्रेसरच्या भागामध्ये काही अडचणी असल्यास आपण स्वतः कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेले पाहिजे कारण कंपनी आपल्याला ओरिजिनल पार्ट्सची ग्यारंटी देते. तुम्ही फ्रिज दुरूस्त करताना लोकल पार्ट्स वापरले तर कंप्रेसरमध्ये स्फोट होऊ शकतो.

जर तुम्ही फ्रिजमध्ये जास्त वेळ काहीही ठेवत नसाल, पण तो सतत चालू असेल, तर तुम्ही तो उघडण्यापूर्वी किंवा त्यात कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी फ्रिजचा पॉवर बंद करा आणि नंतर ती चालू करा. असे केल्याने रेफ्रिजरेटरध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोट होणार नाही.

अधिक वाचा : Mobile Phones : कोणत्या पॉकेटमध्ये ठेवला पाहिजे फोन? चुकीच्या खिशात ठेवल्यास होईल हे नुकसान

रेफ्रिजरेटर वापरताना त्याचे तापमान कधीही जास्त कमी करू नका कारण यामुळे रेफ्रिजरेटरच्या कंप्रेसरवर आवश्यकतेपेक्षा जास्त दबाव येतो आणि फ्रिज खूप गरम होते आणि अशाच वेळी स्फोट होण्याची जास्त शक्यता असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी