Flipkart Sale: तुम्हाला नवीन iPhone खरेदी करायचा असेल तर ही Deal अजिबात चुकवू नका!

Flipkart चा बिग सेव्हिंग डेज सेल सुरु झाला असून या सेलमध्ये iPhone 12 वरही मोठी सूट दिली जात आहे.

flipkart sale if you want to buy a new iphone then dont miss this deal
खूपच स्वस्तात खरेदी करता येईल Iphone, पाहा नेमकी डील (UnSplash) 
थोडं पण कामाचं
  • iPhone 12 चा 64GB व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर 51,999 रुपयांना उपलब्ध
  • या स्मार्टफोनवर तब्बल 13,901 रुपयांची सूट
  • ग्राहक ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये फोन खरेदी करू शकतात.

मुंबई: Flipkartचा बिग सेव्हिंग डेज सेल सध्या सुरु आहे. या काळात अनेक उत्पादनांवर डील आणि सूट देण्यात येत आहे. विक्री गेल्या आठवड्यात सुरू झाली आणि 27 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये iPhone 12 वरही मोठी सूट दिली जात आहे. यासोबतच या फोनवर बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ असू शकते. (flipkart sale if you want to buy a new iphone then dont miss this deal)

जाणून घ्या डील्सबाबत

iPhone 12 चा 64GB व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर 51,999 रुपयांना विकला जात आहे. येथे यावर 13,901 रुपयांची सूट दिली जात आहे. ग्राहक हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. याशिवाय, ग्राहकांना येथे 1,000 रुपयांपर्यंत कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के सूट मिळेल. इतकेच नाही तर ग्राहक एक्सचेंज अंतर्गत 17,000 रुपयांपर्यंतच्या सूटचा लाभ घेऊ शकतात.

अधिक वाचा: Twitter Data for Sell : कोट्यवधी युजर्सचा पर्सनल डेटा विक्रीसाठी उपलब्ध, हॅकर्सनी लावलीय एवढी किंमत

तुम्ही डिस्काउंट आणि सर्व ऑफर्सचा लाभ घेण्यास सक्षम असाल, तर तुम्हाला हा आयफोन 12 फक्त 33,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. म्हणजेच जे ग्राहक हा स्मार्टफोन स्वस्तात घेण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे.

iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन 6.10-इंचाच्या सुपर रेटिना XDR OLED डिस्प्लेसह येतो. यात पॉवरफुल Apple A14 Bionic प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस 12MP चे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 12MP कॅमेरा देखील  देण्यात आला  आहे. हा आयफोन iOS 15.4.1 वर चालतो.

अधिक वाचा: 5G Auction: आजपासून 5G नेटवर्कसाठी लिलाव सुरू; कॉल आणि इंटरनेट वापरण्याची पद्धत बदलणार, काय असेल नवीन जाणून घ्या

iPhone 12 फेस अनलॉक आणि 3D फेस रेकग्निशन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी 2815 mAh क्षमतेची आहे आणि 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट येथे उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ आणि GPS सारखे अनेक फीचर्स आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी