Flipkart Sale: Xiaomi 11, iPhone 12, iPhone 11 वर प्रचंड मोठी सूट

Flipkart Big Saving Days सेलची सुरुवात फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी झाली आहे. उर्वरित सदस्यांसाठी, 23 जुलैपासून विक्री सुरू होईल. यासोबतच अमेझॉन प्राइम डे सेल देखील 23 जुलैपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान, ग्राहकांना विविध ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे.

flipkart sale xiaomi 11 iPhone 12 iPhone 11 are getting huge discounts
Flipkart Sale: Xiaomi 11, iPhone 12, iPhone 11 वर मोठी सूट (सौजन्य: UnSplash)  
थोडं पण कामाचं
 • iPhone 12 मिळणार फक्त 52,999 रुपयांमध्ये
 • Moto G60 स्मार्टफोनवरही भरघोस सूट
 • Xiaomi 11i सेलमध्ये 19,999 रुपयांना उपलब्ध

Flipkart Big Saving Days सेलची (Sale) सुरुवात फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी झाली आहे. उर्वरित सदस्यांसाठी, 23 जुलैपासून विक्री सुरू होईल. यासोबतच अमेझॉन प्राइम डे सेल (Amazon Prime Day) देखील 23 जुलैपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान, ग्राहकांना विविध ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. फ्लॅट डिस्काउंटशिवाय, ग्राहकांना बँक ऑफरचाही लाभ मिळणार आहे. (flipkart sale xiaomi 11 iPhone 12 iPhone 11 are getting huge discounts)

स्मार्टफोनवरील जबरदस्त डील्स:

 1. iPhone 12: सेल दरम्यान हा स्मार्टफोन 52,999 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक Citi, Kotak किंवा RBL बँक कार्ड्ससह रु. 1,000 ची सूट देखील मिळवू शकतात. अशावेळी ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन फक्त 51,999 रुपयांमध्ये मिळू शकतो.
 2. Moto G60: सेलमध्ये या स्मार्टफोनवरही सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 13,999 रुपयांना बँक ऑफरसह खरेदी करता येईल.
 3. Xiaomi 11i: सेलमध्ये या स्मार्टफोनची विक्री 19,999 रुपयांना केली जात आहे. या किंमतीमध्ये बँक ऑफरचाही समावेश आहे.

  अधिक वाचा: New CNG Car: बाजारात आली नवीन स्वस्त सीएनजी कार, जबरदस्त मायलेज!
   
 4. iPhone 11: हा स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, 39,999 रुपयांच्या किंमतीला  हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
 5. Vivo T1 44W: ग्राहक Vivo च्या फास्ट चार्जिंग स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळवू शकतात. हा स्मार्टफोन डिस्काउंटसह 13,499 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
 6. Redmi Note 10 Pro: फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान हा स्मार्टफोन Rs 13,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

  सध्‍या या डीलचा वापर केवळ फ्लिपकार्ट प्लस सदस्यांद्वारेच केला जाऊ शकतो. तर उर्वरित सदस्यांना 23 जुलैपासून तो वापरता येणार आहे.

अधिक वाचा: Iphone 12 price cut : ॲपलप्रेमींसाठी गूड न्यूज! आयफोन 12 झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत

अॅमेझॉनचा देखील प्राइम डे सेल

फ्लिपकार्टप्रमाणेच अॅमेझॉनचा देखील प्राइम डे सेल असणार आहे. यावेळी अमेझॉन प्राइम सदस्यांसाठी रात्रीपासून सुरू होणार आहे. नॉन प्राइम सदस्य देखील काही विक्री डील्सचा लाभ घेऊ शकतात. हा सेल आज रात्री 12 वाजता सुरू होईल आणि 24 जुलै रात्री 11:59 पर्यंत सुरू राहील. अॅमेझॉनने त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन्ससारख्या काही उत्पादनांवरील डील्सची माहिती आधीच दिली आहे. अशा परिस्थितीत ग्राहक आतापासून विशलिस्ट तयार करू शकतात.

या सेल अंतर्गत, अॅमेझॉन स्मार्टफोन, इअरफोन्स, अॅमेझॉन किंडल उत्पादने आणि लॅपटॉप यांसारख्या उत्पादनांवर तात्पुरती किंमत कमी करण्यात आल्या आहेत. याशिवाय, ग्राहकांना सेल दरम्यान SBI किंवा ICICI बँक कार्डवर 10 टक्के सवलतीचा लाभही घेता येईल. अॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान किंमत बदलू शकते याची देखील ग्राहकांनी नोंद घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी