Google Maps ने आणला नवा फीचर, युजरचे वाचणार पैसे, वाचा सविस्तर

गुगलच युजरचा प्रवास सुलभ करण्यासाठी कंपनीने गुगल मॅपमध्ये नवीन फीचर आणले आहेत. या फीचरमुळे युजर्सचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत. गूगल मॅप्समध्ये नवीन फीचर आणले आहे, या फीचरमध्ये ग्राहकांना टोलची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आगामी प्रवासात किती पैसे खर्च होतील आणि किती वाचतील याचा अंदाज बांधणे सोपे जाणार आहे. 

google map
गुगल मॅप  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुगलच युजरचा प्रवास सुलभ करण्यासाठी कंपनीने गुगल मॅपमध्ये नवीन फीचर आणले आहेत.
  • या फीचरमुळे युजर्सचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत.
  • आगामी प्रवासात किती पैसे खर्च होतील आणि किती वाचतील याचा अंदाज बांधणे सोपे जाणार आहे. 

Google Maps : मुंबई : गुगलच युजरचा प्रवास सुलभ करण्यासाठी कंपनीने गुगल मॅपमध्ये नवीन फीचर आणले आहेत. या फीचरमुळे युजर्सचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत. गूगल मॅप्समध्ये नवीन फीचर आणले आहे, या फीचरमध्ये ग्राहकांना टोलची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आगामी प्रवासात किती पैसे खर्च होतील आणि किती वाचतील याचा अंदाज बांधणे सोपे जाणार आहे. (google introduce new feature for plan trip and toll tax)

ग्राहकांना आपली ट्रिप प्लॅन करताना या नवीन फीचरचा फायदा होईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. प्रवासासाठी नेमका किती टोल लागेल ही माहिती गुगल मॅपमध्ये मिळणार आहे. कंपनी टोल ऑथोरिटीकडून टोलची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी लागणार्‍या टोलची माहिती मिळणार आहे. 

इतकेच नाही तर गुगल मॅप्स प्रवाशांना विनाटोल असलेल्या रस्त्याबद्दलही माहिती देणार आहे. त्यामुळे कमी टोल किंवा टोल नसलेल्या रस्त्यांवरून गेल्यास पैश्यांची बचत होणार आहे. इतकेच नाही तर ठराविक वेळेस प्रवास केल्यास किती टोल लागेल याचीही माहिती गूगल मॅप्स देणार आहे. 


ज्या प्रवाशाला आपण निघणार आहोत त्यासाठी कमीत कमी किती टोल लागणार आहे हे कळणार आहे. तसेच गूगल मॅप टोल फ्री मार्गही दाखवणार आहे. यासाठी गूगल मॅपच्या वरती दिसणार्‍या उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. त्यानंत तुम्हाला रुट ऑप्शन दिसणार आहे. जर तुम्हाला टोल फ्री मार्गावरून जायचे नसेल तर avoid tolls पर्यायावर क्लिक करा. अँड्रॉईड आणि iOS युजरसाठी या महिन्यात टोल किती लागेल याची माहिती मिळणार आहे. 


गूगल लवकरच भारत, अमेरिका, जपान आणि इंडोनेशियातील जवळपास २ हजार टोल रोडची माहिती देणार आहे. या फीचरनंतर इतर देशातही हे फीचर लॉन्च करण्यात येईल. गूगलशिवाय iOS युजर्सलाही पिन्ड ट्रिप विजेट फीचर जारी करण्यात आला आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी