गुगलकडून पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्स एल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Google Pixel 4 Price: गूगलनं पिक्सल सीरिजमध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केलेत. जे पिक्सल 4 सीरिजचा एक भाग आहे. दोन्ही स्मार्टफोन खूप आकर्षक फिचरसोबत येतील. जाणून घेऊया किंमत. 

Google Pixel 4 Price
गुगलकडून पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्स एल स्मार्टफोन 

थोडं पण कामाचं

  • गूगलनं पिक्सल 4 सीरिज लॉन्च केला आहे.
  • कंपनीनं या सीरिजमध्ये नेहमीप्रमाणे दोन स्मार्टफोन लॉन्च केलेत.
  • ज्याचं नाव पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्स एल आहे.

गूगलनं पिक्सल 4 सीरिज लॉन्च केला आहे. कंपनीनं या सीरिजमध्ये नेहमीप्रमाणे दोन स्मार्टफोन लॉन्च केलेत. ज्याचं नाव पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्स एल आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही फोनचं मुख्य फिचर त्याचा कॅमेरा आहे. पिक्सल 4 मध्ये रडार सेंसर, मोशन सेंस सारखे फिचर देण्यात आलेत. या फिचरच्या मदतीनं स्मार्टफोन हवेत यूजर्सचं गेस्चर ओळखून काम करतं. यूजर्स केवळ हवेत हात हलवून फोनवर बरेच कामं करू शकतात.

Google Pixel 4, Pixel 4 XL price

गूगल पिक्सल 4 स्मार्टफोन 799 डॉलर (जवळपास 57 हजार रूपये) च्या सुरूवातीच्या किंमतीवर लॉन्च झाला. ही किंमत फोनच्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. गूगल पिक्सल 4 एक्स एल 899 डॉलर (जवळपास 64 हजार रूपये) च्या सुरूवातीच्या किंमतीत येईल. या स्मार्टफोनची शिपिंग 24 ऑक्टोबरपासून सुरू होईल. कंपनीनं हे दोन्ही स्मार्टफोन तीन कलर व्हेरिएंट- जस्ट ब्लॅक, क्लियरली व्हाइट आणि ओह सो ऑरेंजमध्ये लॉन्च केलेत. पिक्सल 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार नाही आहे. 

Google Pixel 4, Pixel 4 XL specifications

फिचरबद्दल बोलायचं झाल्यास, गूगल पिक्सल 4 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 90 हर्ट्जच्या स्क्रीनसोबत येईल. गूगलनं यात टायटन एम सिक्योरिटी चिपचा वापर केला आहे. पिक्सल 4 अॅन्ड्रॉईड 10 सोबत येतो आणि याला पुढील तीन वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट मिळत राहिल. या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाचा फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले आहे. जो एचडीआर सपोर्टसोबत येतो. 

पिक्सल 4 एक्स एलमध्ये 6.3 इंचाचा क्यू एचडी प्लस पॅनल दिला आहे. दोन्हीही स्मार्टफोन गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत येतो. पिक्सल 4 सीरिज 16 मेगापिक्सल आणि 12.2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसोबत येतो. फ्रंटमध्ये कंपनीनं 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 

पिक्सल 4 स्मार्टफोनमध्ये 2800 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. पिक्सल 4 एक्स एलमध्ये 3700 एमएएचची बॅटरी मिळेल. दोन्ही फोन 18 वॉटची फास्ट चार्जिंग, टाइप सी पोर्टसोबत येतो. ड्युअल सिमसाठी यूजर्संना ई सिमचा वापर करावा लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी